दानापूर – गोपाल विरघट
दानापूर येथील सिद्धार्थ नगर येथे माता रमाई जयंती उस्तवात साजरी करण्यात आली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सिद्धार्थ नगर दानापूर येथे जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रमाबाईच्या वेशभूषेत सजलेल्या मुलींनी केक कापला व फटाक्यांची आतषबाजी करून, जयंती साजरी करण्यात आली. रमाबाई आंबेडकर यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी एका निम्रवर्गीय दलित कुटुंबात झाला. पुढे त्यांचा विवाह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झाला.
त्यांना रमाई किंवा आई रमा म्हणून ओळखले जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त उपासक व उपासिका तथा बालक बालिका यांच्याकडून अभिवादन करण्यात आले, जयंतीच्या आयोजन सिद्धार्थ तरुण मंडळ व रुपनंदा महिला मंडळ यांनी केले होते.