Jharkhand Floor Test : झारखंडमधील चंपाई सोरेनच्या फ्लोअर टेस्टसाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात पक्ष आणि विरोधी पक्षाचे आमदार उपस्थित आहेत. सीएम चंपाई सोरेन यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विधानसभेत बोलताना मी अश्रू ढाळणार नाही, असे सांगितले. आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणाचा राजीनामा देईन, असेही ते म्हणाले.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि JMM नेते हेमंत सोरेन यांनी सोमवारी झारखंड विधानसभेला संबोधित केले. ते म्हणाले की, आम्ही अद्याप पराभव स्वीकारलेला नाही. मला तुरुंगात टाकून ते यशस्वी होतील असे त्यांना वाटत असेल, तर हे झारखंड आहे, जिथे अनेकांनी बलिदान दिले आहे.
ते पुढे म्हणाले की, मी अजिबात अश्रू ढाळणार नाही, वेळेवर लक्ष ठेवेन. तुमच्यासाठी अश्रूंना काही महत्त्व नाही. वेळ आल्यावर मी या लोकांच्या प्रत्येक प्रश्नाचे आणि कटाचे उत्तर देईन.
#WATCH | Former Jharkhand CM and JMM leader Hemant Soren says, "Today I have been arrested on charges of 8.5 acre land scam. If they have the courage, then show the documents of the land registered in my name. If it is proved, I will quit politics…" pic.twitter.com/q1WfVJ8P05
— ANI (@ANI) February 5, 2024