- राजू परुळेकर करणार मार्गदर्शन
- जाणीव प्रतिष्ठानच्या वतीने 3 फेब्रुवारीला आयोजन
अमरावती – धार्मिक विद्वेष आणि अखंड भारत या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन जाणीव प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह अमरावती येथे करण्यात आले आहे.
राजकीय विश्लेषक राजू परुळेकर,मुंबई हे या विषयावर यथोचित मार्गदर्शन करणार आहेत. विशेष अतिथी म्हणून अमरावती येथील नामवंत श्वसन रोग तज्ञ डॉ.अनिल रोहनकर आणि पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते दिलीप सोळंके यांची विशेष उपस्थिती यावेळी राहणार आहे.
आज आपल्या आसपास जे काही सुरू आहे, त्यातलं किती खरं आणि किती खोटं हे कुणालाच कळेनासं झालंय. मोबाईल, टीव्ही, सिनेमामधून होत असलेल्या ब्रेनवॉशिंगपासून, मोठमोठ्या नेत्यांच्या फेकाफेकीपर्यंतच्या अनेक गोष्टी अहोरात्र आपल्यापर्यंत पोहचत आहेत. या ‘डिपफेक’च्या जंजाळात आपण आपल्याही नकळत फसत चाललोय.
सर्वत्र असा खोटारडेपणाचा बोलबाला असतांना, खरं बोलणं ही देखील क्रांती ठरते. त्यामुळे जमेल तेवढं खरं मांडत राहायला हवं, उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असे आयोजकांनी कळविले. लोकांचा बुद्धिभ्रम करणाऱ्यांचा पर्दाफाश करणाऱ्या या व्याख्यानाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे