प्रथम संस्था ही मूर्तिजापूर तालुक्यामधील ग्रामीण भागामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवित असते. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे इंग्लिश विंटर कॅम्प. मुलांना इंग्लिश विषयाची गोडी लागावी,मुलांना सहज इंग्लिश समजावं ,त्यांचा शब्दसाठा वाढावा,त्यांना इंग्रजीत बोलता यावं या सोबतच गावातील युवकांचा सहभाग मुलांच्या शिक्षणात टिकून राहावा या उद्देशाने तालुक्यातील 60 गावांमध्ये इंग्लिश कॅम्प राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने 60 गावातील स्वयंसेवकांना त्यांच्या मोहोल्ल्यातील मुलांना सहज सोप्या पद्धतीने व हसत खेळत इंग्लिश शिकवता यावं या करिता त्यांना तालुक्यातील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा मूर्तीजापुर (लाल शाळा) येथे प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी गावामध्ये सक्रिय सहभागी असणाऱ्या स्वयंसेवकांचा देखील सत्कार करण्यात आला.या सोबतच त्यांना डिजिटल कोर्स सुद्धा प्रथम संस्थे मार्फत मोफत देण्यात येणार आहे.
यावेळी प्रशिक्षणाला मार्गदर्शक म्हणून गटसाधन केंद्र मुर्तिजापूर येथील विषय तज्ञ प्रवीण मोहोड यांची उपस्थिती लाभली या सोबतच प्रथम संस्थेचे सुनील इंगळे ,प्रमोद मुगल,भावेश हिरूळकर, वैभव बाजड,अमोल नाईक,तेजस्विनी वासनकर,दिपमाला काळे,दिव्या टेकाडे हे उपस्थित होते.