गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या नेतृत्वात विकासासाठी सदैव तत्परतेने कार्य करीत, या परिसराच्या विकासाकरिता धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचे पाणी खळबंदा जलाशयामध्ये सोडण्यात आले आहे.
यासह अनेक विकास कामे व शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत असल्याने शेतमजूर, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होत आहे. शेतकऱ्यांच्या धानाला हेक्टरी २० हजार रुपये बोनस शासनाने जाहीर केले.
गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन लवकरच प्रफुलभाई पटेल यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. पटेलजी यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हिताचे व क्षेत्राच्या विकासाची भूमिका घेत झालेल्या विविध विकास कामांची माहिती माजी आमदार राजेंद्र जैन याप्रसंगी दिली.
आज ग्राम मुरदाडा ता.गोंदिया येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण, विविध सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन व महिला मेळाव्याचे उदघाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. मेळाव्याला मार्गदर्शन करतांना केंद्र व राज्य शासनाच्या महिलाकरीता असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली.
याप्रसंगी राजेंद्र जैन, सौ.पूजा अखिलेश सेठ, मुनेश रहांगडाले, केतन तुरकर, निरज उपवंशी, घनश्याम मस्करे, शंकरलाल टेम्भरे, सरला चिखलोंडे, पूजाताई उपवंशी, नितीनकुमार नागपुरे, प्रकाश कटरे, दीपलता ठकरेले, स्वाती टेम्भरे, तुलशी बघेले, राखी ठाकरे, रीना रोकडे, हेमराज बीजेवार, महेश टेटे, जितेंद्र मारबदे, ममता बागडे, सुनीता गोखे, सुंदरीताई नागपुरे, मनीषा पवनकार, संगीता कापसे सहित मोठ्या संख्येने ग्रामवासी उपस्थित होते.