Bihar Politics : देशाच्या राजकारणात कधी काहीही घडू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशभरातील भाजपविरोधी पक्षांना एकत्र करून INDIA आघाडीत महत्वाची भूमिका निभावणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे मन कोणालाच कळत नाही. दोन्ही बाजूंनी दबावाचे राजकारण केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. पण, यावेळी प्रकरण पुढे गेल्याचे दिसते. नितीशकुमार आणि लालू यादव यांच्यात चांगली जुंपली असून नितीशकुमार यांनी आज आपल्या आमदारांना gबैठकीसाठी लावले असल्याने मोठा राजकीय काही तरी घडणार असल्याचे संकेत मिळत आहे.
आता महाआघाडीतील दोन प्रमुख पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांच्यात धुसफूस असल्याची माहिती येत आहे. तसेच नितीशकुमार हे भाजप आणि मोदी यांच्याबाबत थोडे मवाळ असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाचे नेते लालू यादव कुटुंबावर निशाणा साधत आहेत आणि नितीश यांच्यावर उदासीनता दाखवत आहेत. आता हिंदुस्थानी अवामी मोर्चानंतर भाजपने आपल्या आमदारांना पाटण्याला बोलावल्याने बिहार विधानसभेचे गणितही बिघडणार असल्याचे काही मिडिया सांगत आहेत. तर नितीशकुमार हे पुन्ह भाजपसोबत जाणार असल्याचे मिडिया रिपोर्ट सांगत आहे.
बिहारच्या राजकीय परिस्थितीबद्दल, राज्याचे अर्थमंत्री आणि JD(U) नेते विजय कुमार चौधरी म्हणतात, “मी उद्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी बिहार शरीफला जात आहे… सरकारमध्ये सर्व काही ठीक आहे, म्हणूनच मी जात आहे.”
#WATCH | On Bihar political situation, State Finance Minister & JD(U) leader, Vijay Kumar Choudhary says, "I am going to Bihar Sharif for Republic Day program tomorrow…Everything is fine in the government, that is why I am going." pic.twitter.com/7ZMzbp64qN
— ANI (@ANI) January 25, 2024