Politics : एकीकडे राज्यात मराठा मोर्चा सुरु असताना दुसरीकडे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना पहिले अधिकृत पत्र लिहून 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी त्यांचा वंचित बहुजन आघाडीचा प्रतिनिधी विरोधी पक्षाच्या बैठकीसाठी पाठवण्याची विनंती केली आहे.
महाविकास आघाडीकडून पत्रात केलेला उल्लेख…देश अत्यंत कठीण कालखंडातून जात आहे. आपण स्वतः महाराष्ट्रासह देशभरात सध्याच्या हुकूमशाही विरोधात खंबीरपणे आवाज उठवीत आहात. देश व संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वच समविचारी पक्षांनी एकत्र येऊन हुकूमशाही विरूध्द लढा देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा करीत आहेत. वंचित बहुजन आघाडी राज्यातील महत्त्वाचा घटक असून दिनांक २५ जानेवारी रोजी होणाऱ्या चर्चेत ‘वंचित’ आघाडीने सहभागी व्हावे, अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे. कृपया ‘वंचित’तर्फे महत्त्वाचे नेते आपण आजच्या बैठकीसाठी पाठवावे ही विनंती.
Maha Vikas Aghadi leaders writes the first official letter to Prakash Ambedkar requesting him to send his Vanchit Bahujan Aghadi representative for Opposition meeting to discuss the seat sharing for 2024 Lok Sabha elections at hotel Trident, Nariman Point, Mumbai. pic.twitter.com/6Vu1wEyUTg
— Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) January 25, 2024
प्रकाश आंबेडकरांची भूमिका महाराष्ट्राला नवी दिशा देणारी ठरेल. आंबेडकरी विचारधारेची मतांची संख्या , महाराष्ट्रात भाजपाला अनपेक्षित आणि महाविकास आघाडीला अपेक्षित निकाल देऊ शकतात अशी चर्चा सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्याच्या पटलावर आंबेडकरी विचारधारांच्या मतांची संख्या लक्षात घेता आणि या मतांची काँग्रेस-राष्ट्रवादीने फारशी दखल न घेतल्यामुळे. त्याचा आपसूकच अप्रत्यक्ष फायदा तेव्हाच्या भाजप सेनेला मिळाला मात्र यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठा महाविकास आघाडीने घेतलेली खबरदारी पत्थ्यावर पडू शकते असं चित्र महाविकास आघाडीने दिलेल्या निमंत्रणावरून निर्माण झाल आहे