Pakistan : पाकिस्तानसाठी सध्याची वेळ चांगली नाही. इराणने बलुचिस्तानमध्ये केलेले हवाई हल्ले आणि त्यानंतर केलेल्या प्रत्युत्तरादाखल हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनले आहेत. दरम्यान, पाकिस्तानी लष्कर आणि अफगाण सैनिकांमध्ये चकमक झाल्याचेही वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सीमा रक्षक आणि अफगाण सत्ताधारी तालिबान यांच्यात शनिवारी ड्युरंड रेषेवर चकमक झाली, ज्यामध्ये किमान दोन सैनिक ठार झाले.
टोलो न्यूजने स्थानिक सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, गेल्या वर्षी तुरळक चकमकीनंतर अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात सीमेवर तालिबान आणि पाकिस्तानी लष्करी जवानांमध्ये चकमकीची एक नवीन घटना समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी सैन्याने सीमेचे उल्लंघन केल्यानंतर चकमक सुरू झाली, त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने कुनार प्रांतातील तालिबानी स्थानांवर गोळीबार केला. या चकमकींमध्ये दोन जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे.
याआधी गुरुवारी, पाकिस्तानने इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील ‘दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर’ ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी लष्करी हल्ले केले होते, ज्यात 9 लोक मारले गेले होते. पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतातील सुन्नी बलूच दहशतवादी गट ‘जैश अल-अदल’च्या लक्ष्यांवर इराणने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्यानंतर दोन दिवसांनी हे हल्ले झाले. या हल्ल्यांनंतर, पाकिस्तानने इराणमधून आपल्या राजदूताला परत बोलावले आणि यापूर्वी नियोजित सर्व उच्चस्तरीय द्विपक्षीय भेटी स्थगित केल्या.
इराणचा हल्ला आणि पाकिस्तानच्या प्रतिहल्ल्यांनी पश्चिम आशियातील अस्थिर प्रदेशात चिंता वाढवली आहे, आधीच गाझा पट्टीत हमास विरुद्ध इस्रायलचे युद्ध आणि येमेनच्या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात व्यावसायिक जहाजांना लक्ष्य केल्यामुळे ते पसरले आहे.
An Update🚨 Pakistan 🇵🇰 Afghanistan🇦🇫
— Izlamic Terrorist (@raviagrawal3) January 20, 2024
A scene of clashes between Taliban security forces and the Pakistani army on the Durand Line in Sapera in the Ganjgal valley of Kunar province. According to local sources, at least 2 soldiers of the Pakistani army have been killed. pic.twitter.com/noXE6gMubd