स्वराज्य संघटना वाशिम यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम यांना निवेदन…
वाशिम – चंद्रकांत गायकवाड
जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय कॉलेजेस दुपारच्या वेळी अथवा कॉलेज सुटल्यानंतर कॉलेजच्या बाहेर होणारी मुला मुलींची असंख्य रस्त्यावरची गर्दी मोठ्या प्रमाणात असते, अनेक गैरप्रकार घडल्याचे तक्रारी दिसून येतात, आणि ह्या तक्रारी समजून घेऊन जिल्ह्यातील सबंध पालक वर्गाच्या वतीने वाशिम पोलीस अधीक्षक कार्यालयास निवेदन अर्ज दिला आहे की किमान पंधरा दिवसातून एक व्हिजिट प्रत्येक कॉलेज वरती असावी, जेणेकरून वातावरण चांगले राहील, त्यासोबत वाशिम पोलीस कार्यालयाची हेल्पलाइन क्रमांक जिल्ह्यातील सर्वच कॉलेज महाविद्यालयाच्या परिसरात लावण्यात यावे, अशा पद्धतीचे निवेदन गोपाल भिसडे स्वराज्य राज्य सदस्य तथा प्रवक्ते यांनी दिले आहे, यावेळी शुभम धबाले, दीपक थोरात, अजय पठाडे,उपस्थित होते..