नांदेड – महेंद्र गायकवाड
बिलोलीचे उपविभागीय सहा. पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांचे गोपनिय माहितीच्या अधारे व मार्गदर्शनाखाली कुंटूर पोलीसांनी मंदीर चोरीतील तीन आरोपीतांना केले चोवीस तासाचे आत अटक. पोस्टे कुंटूर हद्दीतील मौ. कुष्णूर एम. आय. डी. सी. मधील फ्लेमींगो मेडिसिन कंपणीच्या बाजुस शंकर महाजन यांचे शेतातील हेमाडपंथी महादेव मंदीरातील अज्ञात चोरटयांनी चोरी करण्याच्या उद्देशाने महादेव मंदिरात जाऊन मंदिरामधील महादेवाची दगडाची पिंड उखरून बाजुस काढुन त्या खाली अंदाजे दीड फुटाचा खड्डा खोदुन महादेव मंदीरातील पिंडीचे नुकसान करून विटंबना करून चोरी करण्याचा प्रयत्न केला.
सदर घटनेवरून रघुनाथ पि. दिगांबर कमठेवाड, वय 61 वर्षे, व्यवसाय शेती रा. मौ. कुष्णूर ता. नायगाव यांचे फिर्यादवरून पोस्टे कुंटूर गुरन 158/2022 कलम 379, 295,511 भादवि प्रमाणे दिनांक 08.09.2022 रोजी 22.18 वा. गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पोउपनि संजय अटकोरे यांचेकडे दिला होता.
सदर घटनेची माहिती महादेव पुरी, सपोनि पोस्टे कुंटूर यांनी अर्चित चांडक, सहा. पोलीस अधिक्षक उपविभाग बिलोली यांना कळविली. अर्चित चांडक यांचे गोपनिय माहितीच्या अधारे दोन पथके स्थापन करून अज्ञात आरोपीतांना ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या होत्या.
महादेव पुरी, सपोनि पोस्टे कुंटूर हे स्वतः, पोउपनि दिनेश येवले, सपोउपनि रमेश निकाते, पोहेकॉ संतोष कुमरे, लक्ष्मण सोनकांबळे, मोहन कंधारे, पोशि अशोक घुमे, चालक रामेश्वर पाटील, होमगार्ड यश यांनी गोपनिय माहितीच्या आधारे चोवीस तासांचे आत तीन आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले आहे.
1) बालाजी बाबु इरपे, वय 32 वर्षे, व्यवसाय शेती रा. बरबडा ता. नायगाव 2 ) विष्णु आनंदराव डुकरे, वय 32 वर्षे, व्यवसाय मोटार मेकॅनिक रा. कोरका पिंपळगाव ता. जि. नांदेड 3 ) अशोक विट्ठल मैसणवाड, वय 45 वर्षे, व्यवसाय शेती रा. बरबडा यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर तीन आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, अर्चित चांडक, सहा पोलीस अधिक्षक उप विभाग बिलोली यांचे मार्गदर्शनाखाली वरील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केलेली आहे. सदर कारवाई बाबत वरिष्ठांनी पोलीस पथकाचे अभिनंदन केले आाहे.