Suryakumar Yadav : भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-20 मालिकेत टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली होती. या मालिकेतच सूर्यकुमार जखमी झाला. दुखापतीमुळे सूर्यकुमार अफगाणिस्तानसोबत खेळलेल्या टी-20 मालिकेलाही मुकला आहे. दुखापतीनंतर सूर्यकुमार यादवच्या मांडीवर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. शस्त्रक्रिया करण्यासाठी सूर्यकुमार यादव जर्मनीला पोहोचला होता. सूर्यकुमारची शस्त्रक्रिया जर्मनीतील म्युनिक येथे झाली.
सूर्यकुमार यादव कधी परतणार?
कंबरेच्या शस्त्रक्रियेनंतर, सूर्यकुमार यादव यांना आता एनसीएमध्ये पुनर्वसन प्रक्रियेला सामोरे जावे लागेल. मात्र, सूर्यकुमार यादव मैदानात कधी परतणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव आयपीएल 2024 पूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकतो. त्यानंतर चाहत्यांना सूर्या फक्त आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसेल. स्वत: सूर्यकुमार यादवने यशस्वी कंबरेच्या शस्त्रक्रियेची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सूर्यकुमारने शस्त्रक्रियेनंतरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
शस्त्रक्रिया झाली…
”माझ्या प्रकृतीबद्दल त्यांच्या चिंतेबद्दल आणि शुभेच्छांबद्दल मी सर्वांचे आभार मानू इच्छितो आणि तुम्हा सर्वांना सांगताना मला आनंद होत आहे की मी लवकरच परत येईन”…
T20 विश्वचषक 2024 साठी तयारी करणार आहे
जूनमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक 2024आधी टीम इंडियाने अफगाणिस्तानसोबत शेवटची T20 मालिका खेळली आहे. भारतीय संघाने ही मालिका ३-० ने जिंकली. आता टीम इंडियाच्या नजरा 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीवर असतील. ज्यासाठी संघातील सर्व खेळाडू तंदुरुस्त असणे अत्यंत आवश्यक आहे.
सूर्यकुमार यादव हा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर वन फलंदाज आहे, त्यामुळे या मोठ्या स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादव पूर्णपणे तंदुरुस्त असणे खूप महत्त्वाचे आहे. शस्त्रक्रियेनंतर सूर्यकुमार यादव आता आयपीएल 2024 आणि टी20 विश्वचषक 2024 च्या तयारीला सुरुवात करेल.
Surgery done✅
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) January 17, 2024
I want to thank everyone for their concerns and well wishes for my health, and I am happy to tell you all that I will be back very soon 💪 pic.twitter.com/fB1faLIiYT