Wednesday, November 6, 2024
Homeराज्यजिल्ह्यातील औद्योगिक ग्राहकांसाठी 'स्वागत कक्ष' कार्यान्वित...

जिल्ह्यातील औद्योगिक ग्राहकांसाठी ‘स्वागत कक्ष’ कार्यान्वित…

तत्पर सेवेसाठी महावितरणचा उपक्रम

अमरावती,दि.१८ जानेवारी २०२३; जिल्ह्यातील सर्व औदयोगिक वीज ग्राहकांसाठी विद्युत भवन अमरावती येथे जिल्हा स्तरावर एक स्वतंत्र ‘स्वागत कक्ष ‘ कार्यान्वित करण्यात आले आहे. नविन वीज जोडणीसह वीज पुरवठ्याशी संबंधित तक्रारीचे तत्परतेने निराकरण करण्यासाठी ‘स्वागत कक्ष’ तयार करण्यात आले असून जिल्ह्यातील औदयोगिक ग्राहकांनी महावितरणच्या या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले आहे.

महावितरणच्या महसुलाचा औद्योगिक ग्राहक हा प्रमुख स्रोत आहे. तसेच औद्योगिक वीज ग्राहकांकडून नियमित आणि वेळेत विजबिल भरणा करण्यात येतो. ‘स्वागत कक्षामुळे औद्योगिक ग्राहकांना वीजसेवा व तक्रारींसाठी स्थानिक कार्यालयाऐवजी आता थेट मंडल स्तरावर संपर्क साधता येणार आहे.त्याचबरोबर स्थानिक कार्यालयांच्या औद्योगिक ग्राहकसेवांसाठी या कक्षाकडून समन्वय व दैनंदिन देखरेख राहणार आहे.

‘स्वागत कक्ष ‘ संपर्क क्रमांक व ईमेल :- जिल्ह्यातील औद्योगिक ग्राहकांना तत्पर सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘स्वागत कक्षा ‘ ला संपर्क करण्यासाठी औद्योगिक वीज ग्राहकांसांठी ७८७५३९०२२३ हा संपर्क क्रमांक आणि [email protected] ईमेल आय डी उपलब्ध करून देण्यात आला.

‘स्वागत कक्षा’ ची कार्यपध्दती :- ‘स्वागत कक्षा’ चे प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता प्रशासन व व्यवस्थापक (वित्त व लेखा) काम पाहणार आहे. या कक्षाकडे संपर्क साधल्यानंतर औद्योगिक ग्राहकांच्या बिलिंग व वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यात येईल. तसेच नवीन वीजजोडणी, भार वाढ व इतर सेवा देण्यासाठी थेट ग्राहक दारी जाऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यासह विनाविलंब सेवा दिली जाणार आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: