नांदेड – महेंद्र गायकवाड
वाढत्या ऑनलाईन फसवणूकीबदल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आपल्या फेसबुक पेजवरून एक महत्वाची पोस्ट जनहितार्थ टाकली असून त्यांनी त्या पोस्टद्वारे ऑनलाईन ठगांना बळी पडू नका असे आवाहन जनतेला केले आहे.
आजघडीला नांदेड जिल्ह्यात व सर्वत्र ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार मोठया प्रमाणात वाढत असून अनेकजण अमिषाला बळी पडत ऑनलाईन फसत आहेत. यात अनेकांचे आर्थिक नुकसान होत आहे. या ऑनलाईन फसवणूकी बदल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आपल्या फेसबुक पेजवरून एक महत्वाची पोस्ट शेयर केली आहे.
त्या पोस्ट मध्ये जिल्हाधिकारी म्हणतात की, मुळात फेसबुक ही आर्थिक व्यवहार करण्याची जागा नाही. त्यामुळे माझा किंवा कोणाचाही फोटो आणि इतर माहिती वापरणाऱ्या अकाउंट वरून पैश्यांची मागणी झाली किंवा फर्निचर विकायची ऑफर आली तर सरळ सरळ ते फसवणूक आहे म्हणून ओळखा.
अजिबात प्रतिसाद देऊ नका आणि रिपोर्ट करा. ज्याला पैश्यांची गरज आहे किंवा फर्निचर विकायचे आहे ती व्यक्ती तुम्हाला किमान फोन करेल.
असे म्हणत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ऑनलाईन ठगांना बळी पडू नका असे आवाहन जनतेला केले आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.