अकोला – देशात संविधान वाचवण्याचे काम कॅाग्रेस पक्षाचे नेते खा. राहूलजी गांधी करत असल्यामुळे संविधान वाचण्याच्या लढ्यात सहभागी होण्याकरीता कॅाग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, खा. राहूल गांधी, कॅाग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. मलिकार्जुन खरगे, महाराष्ट्र कॅाग्रेसचे अध्यक्ष आ. नाना पटोले, अखिल भारतिय कॅाग्रेसचे नेते माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन तसेच अकोला जिल्ह्यातील सहकार नेते तथा जिल्हा कॅाग्रेसचे जेष्ठ नेते सुनिल धाबेकर, जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर व कॅाग्रेसचे युवानेते भूषण गायकवाड यांच्या नेतृत्वात दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी स्वराज्य भवन अकोला येथे रिपाई आठवले गटाचे पद्माकर वासनिक यांच्यासह गौतम उमाळे,
दादाराव वानखडे, मिलिंद गावंडे, संतोष लबडे, विकी गुंजाळ, सतिष दाभाडे, मदन कांबळे, प्रसिद्ध ओऐ, संस्कार ढोके, समर्पन ढोके, प्रेमसुद गद्रे, मनोज इंगळे, रवि गावंडे, सुरज जामनिक, मनिष गुंजाळ, विकास गुंजाळ, सुनिल गुंजाळ, रवि मानकर तसेच शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जाहिर पक्ष प्रवेश करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते डॅा. सुधिर ढोणे, जिल्हा उपाध्यक्ष डि ए पाटील, जिल्हासरचिटणीस अंशुमन देशमुख, नागसेन सिरसाट, मनिष मिश्रा उपस्थित होते.