सांगली – ज्योती मोरे
सांगली जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत सातेशे पेक्षा जास्त कामांची गुणवत्ता व दर्जा टिकवण्यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी ११२ अभियंता कार्यरत असून त्यांचे मार्फत देखरेख करण्यात येत आहे व परिणामकारक देखरखीसाठी जिल्हा परिषद मधील सर्व विभाग प्रमुखांना तालुक्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच येथूनपुढे वेब पोर्टल च्या माध्यमातूनही सनियंत्रण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जितेंद्र डूडी यांनी दिली.
जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात पाचशे पेक्षा जास्त पाणीपुरवठ्याची कामे सुरु असून येत्या काही कालावधीत २०० कामे सुरु होणार आहेत. या कामांच्या दर्ज्या व गुणवत्ता टिकवण्यासाठी शासकीय व कंत्राटी असे ८२ व बह्यास्त्रोत संस्थेचे ३० असे एकूण ११२ शाखा अभियंता कार्यरत असून त्यांच्यात कामांचे वाटप करण्यात येणार आहे. या सर्वांवर नियंत्रण करण्याची जबाबदारी संबंधित उप अभियंताची असणार आहे.
कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्हास्तरावरील सर्व विभाग प्रमुखांना तालुक्यांचे वाटप करण्यात येणार असून त्यांनी तपासणी सुची (check list) देण्यात येणार आहे. त्या तपासणी सुची च्या माध्यमातून कामांची गुणवत्ता तपासून अहवाल सदर करावयाचा आहे. तसेच पाणीपुरवठा कामांचा दर्जा व गुणवत्ता सनियंत्रण करण्यासाठी वेब पोर्टल ची निर्मिती करण्यात येत असून त्यावर संबधित कामाचे देयेक व देयेक सदर करताना कामांचा व्हिडीओ जोडावे लागणार आहे.
सदर व्हिडीओ हा उच्च दर्जाचा असणे व कामाचे सर्व बारकावे दर्शविणारा असणे बंधनकारक असणार आहे. विभाग प्रमुखांनी सादर केलेला अहवाल व वेब पोर्टल वरील व्हिडीओ हे स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी तपासून देयक अदा कार्याचा निर्णय घेणार आहेत.
खातेप्रमुखांचा अहवाल व व्हिडीओच्या आधारावर गुणवत्तेची तपासणी करण्यात येणार असून त्यात जर तफावत आढळली तर त्याची गंभीर दाखल घेण्यात येऊन संबंधित ठेकेदारावर योग्य कारवाई करण्यात येणार आहे.
कामाचा दर्जा व गुणवत्ते संदर्भात जर तक्रार प्राप्त झाली तर वालचंद कॉलेज ऑफ इंजनिरिग किंवा आर. आय. टी. अश्या संस्थेकडून तपासणी करण्यात येणार असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. यासर्व कामांच्या नियोजनाची प्रत्यक्ष सूचना देणेसाठी सर्व अभियंते, सर्व ठेकेदार यांची दि. 13 सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हा परिषद सभाग्रुहात घेण्यात येणार आहे.