पुणे : १० जानेवारी विश्व हिंदी दिवस निमित्त कॉलेज आय क्यू ए सी हिंदी विभाग वर्ल्ड नेटवर्क फॉर प्रमोशन ऑफ हिंदी व पृथा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय संगोष्ठी व सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून डॉ. नीलम जैन ,प्रमुख पाहुणे डॉ. रणजीत सिंग अरोरा, प्राचार्य आफताब अन्वर शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.
यामध्ये ब्लॉसम पब्लिक स्कूल ताथवडे येथील हिंदी शिक्षिका समृद्धी सुर्वे यांना हिंदी भाषा क्षेत्रात अध्यापन व योगदान दिल्याबद्दल हिंदी सेवी सन्मान ,२०२४ देण्यात आला.
समृद्धी सुर्वे सध्या ब्लॉसम पब्लिक स्कूलमध्ये कार्यरत असून हिंदी भाषा प्रचार- प्रसार साठी कार्य करत आहेत. हिंदी भाषा विषयक कार्यशाळा संगोष्टी ,कवीसंमेलन यांचे त्या आयोजन करतात. सध्या हिंदी विषयांमध्ये विद्यावाचस्पती (पी.एचडी) करत आहेत सर्व स्तरातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.