रामटेक – राजु कापसे
केंद्र सरकारने ट्रकचालकांविरोधात आणलेला रन अँड हिट कायदा रद्द करण्यासाठी ट्रकचालकांनी ५ जानेवारीपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ च्या बाजूला बसून स्टेरिंग छोडो बेमुदत आंदोलन सुरू केले आहे, मात्र शासन प्रशासन मागण्या मान्य करत नसून आंदोलन कर्त्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करून डोळे मिटून बसले आहेत.
स्थानिक ट्रकचालकांनी हिट अँड रन कायद्याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली सुरू केलेल्या आंदोलनाबाबत एसडीओ, डीवायएसपी यांच्यासह भारत सरकारचे गृहमंत्री आणि परिवहन मंत्री यांना निवेदन देऊनही सरकारी प्रशासन या आंदोलकांबाबत मौन बसलेले आहे.
या बेमुदत पुकारलेल्या आंदोलनाला ५ दिवस लोटूनही अजूनही राजकीय नेते व प्रशासकीय अधिकारी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली नसल्याची माहिती आहे. तर एकीकडे ट्रक चालकाच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते व प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव श्री.सुजात आंबेडकर यांनी भेट देत ट्रकचालकांना मार्गदर्शन केले.तर दुसऱ्या टोकावरील आंदोलकांनी हा काळा कायदा रद्द होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे.