पातूर – निशांत गवई
शहरात पातूर येथील माजी मुख्याध्यापिका कमल रामदास उगले यांची नात व न.प. पातूर च्या माजी सभापती सौ. रत्ना उगले यांची मुलगी कु. ऐश्वर्या सुरेंद्र उगले हीने गृह मंत्रालय भारत सरकार द्वारा संचलित राष्ट्रीय न्यायवैद्यकिय विज्ञान विश्वविद्यालय गांधीनगर ( गुजरात ) येथुन पोलीस सायन्स & सिक्युरिटी स्टडीज मधे स्नातकोत्तर पदवी परीक्षेत दोन सुवर्ण पदक मिळवून पातुर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
नुकत्याच गांधीनगर येथे झालेल्या दीक्षान्त समारंभात केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्री श्री.धर्मेंद्र प्रधान याचे हस्ते पदवीदान करण्यात आले ह्याप्रसंगी ॠषीकेश पटेल शिक्षण मंत्री गुजरात, गैस्पर्ड ट्वागिरायझु शिक्षण मंत्री रवांडा गणराज्य व कुलगुरू पद्मश्री डाॅ. जे. एम. व्यास आदी मान्यवर उपस्थित होते.
ऐश्वर्याचे प्राथमिक शिक्षण नगर परिषद शाळा पातूर येथे झाले असुन तीचे बारावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले. गुणवत्तेनुसार सर्वसामान्य कोट्यातुन तिने फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथुन मेरीटमधे मानसशास्त्रातुन पदवी संपादन केली.
उच्च शिक्षणासाठी गांधीनगर गुजरात येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे शैक्षणिक कर्ज काढून तीने आपले स्नातकोत्तर शिक्षण जिद्दिने पुर्ण करुन विश्वविद्यालया अंतर्गत दोन सुवर्ण पदक मिळविले आणी शिक्षणाची द्वारे सर्वांसाठी विशेषतः मुलींसाठी खुले करणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी सुवर्ण पदके अर्पण केली…
आपल्या यशाचे श्रेय तीने पोलिस सायन्स & सिक्युरिटी स्टडीज विभागाचे डीन एअर कमांडर केदार ठक्कर सर, डाॅ.पवित्रण नंबियार सर व आपल्या पालक मित्र मैत्रीणीला दिले.