Guna Bus Fire : मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी प्रवाशांनी भरलेल्या बसला अचानक आग लागली. या आगीत अनेक जण जिवंत जळल्याची भीती व्यक्त केली जात होती. आता या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली आहे. दुहई मंदिराजवळ हा अपघात झाला. या घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे.
वृत्तसंस्था ANI ने जिल्हा रुग्णालय गुनाचे सीएचएमओ डॉ. एस. भोला यांच्या हवाल्याने सांगितले की, अपघातस्थळावरून 11 जणांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. बाकीच्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. बस एका डंपरला धडकली, त्यानंतर बसला आग लागली आणि या मध्ये प्रवासी जळल्याचे लागल्याचे सांगण्यात येत आहे. बस गुनाहून आरोनला जात होती. या आगीत आणखी १५ जण भाजले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.
अपघाताच्या चौकशीचे आदेश
मुख्यमंत्र्यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनेची सर्व बाजूंनी चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. असे अपघात पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मृतांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याची घोषणा
बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. यासोबतच जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
MP: 11 killed as bus catches fire in collision with dumper truck in Guna
— ANI Digital (@ani_digital) December 27, 2023
Read @ANI Story | https://t.co/nwXvVOnTZQ#MadhyaPradesh #Guna #Accident pic.twitter.com/rzeOszuO6P