नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड शहरात दिनांक 9 सप्टेंबर रोजी श्री गणेश उत्सव अनुषंगाने श्री गणेश विसर्जन होणार आहे. सदर कालावधीत शांतता व कायदा सुव्यवस्था राखणेकामी श्री. प्रमोद शेवाळे, पोलीस अधिक्षक नांदेड यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारान्वये दिनांक 9 सप्टेंबर 2022 रोजी 11.00 ते 24.00 वा. दरम्यान खालील प्रमाणे वाहतूक मार्गात तात्पुरता बदल करण्यात येत आहे.
वाहतूकी करीता बंद असलेले मार्ग जुना मोंढा, देना बँक, महाविर चौक, तरोडेकर मार्केट, वजिराबाद चौक, कलामंदीर, शिवाजीनगर ते आय.टी. आय. चौकापर्यंत जाण्या-येण्यास बंद राहील. 2. राज कॉर्नर कडुन आय. टी. आय. कडे येण्यसाठी राज कॉर्नर, वर्कशॉप टी पॉईंट, श्रीनगर ते आय. टी. आय. पर्यंत डावी बंद राहील.
राज कॉर्नर ते तरोडा नाक्याकडे जाण्यासाठी डावी बाजु बंद राहील. सिडको हडको जुना मोंढयाकडे येणारी वाहतुक पुर्णपणे बंद राहील. यात्री निवास ते जुना मोंढा, बर्की चौक (01 मार्गी रस्ता असल्याने) ये- जा करण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. सिडको-हडको, लातुर फाटा येथुन नांदेड शहराकडे नावघाट पुलावरून इतवारा भागात व नवीन पुलावरून जुना मोंढा भागात येणारी वाहतुक पुर्णपणे बंद राहील.
वाहतूकी करीता पर्यायी असलेले मार्ग वजिराबाद चौकाकडुन श्रीनगर, वर्कशॉपकडे जाणारी वाहतुक वजिराबाद चौक, पोलीस मुख्यालय कॉर्नर, लालवाडी अंडर ब्रिज, शिवाजीनगर (पिवळी गिरणी) ते गणेशनगर वाय पॉईंटकडे जाण्या-येण्यासाठी वापर होईल. राज कॉर्नर ते जुना मोंढा मार्गावरील वाहतूक राज कॉर्नर, वर्कशॉप कॉर्नर, भाग्यनगर, आनंदनगर, नागार्जुना टि पॉईट, अण्णाभाऊ साठे चौक, यात्रीनिवास पोलीस चौकी, अबचलनगर ते पुढे जाण्या येण्यासाठी वापर करतील.
आय. टी. आय. चौक ते अणाभाऊ साठे पुतळा चौक व्हीआयपी रोड दोन्ही बाजुने येण्या-जाण्यास वापर करतील. गोवर्धन घाट पुलावरून नांदेड शहरात येणारी वाहतूक पोलीस चौकी कार्नर, लालवाडी, अंडरब्रिज, शिवाजीनगर (पिवळी गिरणी) ते गणेशनगर वाय पॉईंटकडे जाण्यासाठी वापर करतील. सिडको हडको कडुन येणारी वाहतुक साईकमान, गोवर्धन घाट नवीन पुल, तिरंगा चौक, पोलीस चौकी कार्नर, लालवाडी अंडर ब्रिज, शिवाजीनगर (पिवळी गिरणी) ते गणेशनगर वाय पॉईंटकडे जाण्यासाठी वापर करतील.
यात्री निवास ते जुना मोंढा, बर्की चौक मार्गावरील वाहतुक महमंदअली रोड किंवा धान्य मार्केट वाटमारी रोड किंवा बर्फी चौक ते लोहार गल्ली रोड (गणेश टॉकी रोड) भगत सिंह चौक, अबचलनगर, यात्री निवास पोलीस चौकी, बाफना टि पॉईंट व पुढे जाण्या-येण्यासाठी वापर करतील. लातुर फाटा, सिडको हडको, ढवळे कॉर्नर, चंदासिंग कार्नर, धनेगांव चौक, वाजेगाव, जुना पुल, देगलुर नाका पुढे बाफना मार्गे जाण्या-येण्यासाठी वापर करतील. तरी वरील प्रमाणे दिनांक 09.09.2022 रोजी 11.00 ते 24.00 वा. पावेतो वाहतूकीस अडथळा होऊ नये याकरीता पर्यायी मार्गाची अधिसुचना प्रसिध्द करण्यात येत आहे.