रामटेक – राजू कापसे
कविकुलगुरु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नालाजी अँण्ड सायंस (किट्स) रामटेक मध्ये नविन प्राधापकाकरीता दोन दिवसीय मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कंम्युटर विभाग मार्फत कालिदास सेमिनार हॉल मध्ये करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन ताई गोळवलकर सायंस महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु यांचे हस्ते झाले. अध्यक्षता प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांनी केली.
यावेळी प्रामुख्याने कंम्पुटर विभाग प्रमुख व आयोजक डॉ. विलास महात्मे, समन्वय प्रा. भूषण देशपांडे, मेकॅनिकल विभाग प्रमुख व आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. यशवंत
जिभकाटे, रजिस्ट्रार, सर्व विभाग प्रमुख, डीन व प्राध्यापक उपस्थित होते. मार्गदर्शन पर डॉ. राजेश सिंगरु म्हणाले की नविन प्राध्यापकासाठी शिकवण्याचे व इतर मार्गदर्शन जरूरी आहे.
त्यामुळे शिकवण्याच्या पद्धतीत बद्दल घडतो. त्यात विद्यार्थीि व प्राध्यापक दोन्ही लाभान्वीत होतात. ते म्हणाले की कर्मचा-यांनी संस्थेला परिवार समजून कार्य करावे. त्यामुळे आपलेपण येईल. वेळोवेळी शिक्षकांना संस्थेनी प्रोत्साहीत करावे. यामुळे शिक्षकांचा उत्साह वाढेल.
दोन दिवशीय कार्यक्रमामध्ये डॉ. अविनाश श्रीखंडे, डॉ. विलास महात्मे, डॉ. यशवंत जिभकाटे, डॉ.सतीश भेले यानी शैक्षणीक बाबी, व्यावसायीक मार्गदर्शन, शिक्षण पद्धती, प्रोजेक्ट, पेटंट सहित इतर मार्गदर्शन केले. संचालन प्रा. भूषण देशपांडे तरवआभार प्रा. अंकिता नाथे यानी केले.