Monday, November 25, 2024
Homeराज्यपरमपूज्य रमतेराम महाराज पायी दिंडी सोहळ्याचे पातुर येथे स्वागत...

परमपूज्य रमतेराम महाराज पायी दिंडी सोहळ्याचे पातुर येथे स्वागत…

पातूर – निशांत गवई

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे महाप्रसाद कार्यक्रम…बाल किर्तन करांच्या कीर्तनाचा घेतला भाविकांनी लाभ संस्काराला जीवनामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे संस्कार असेल तर माणसाचे जीवन सुखमय होते आणि हा संस्कार बालमनापासून मिळाला तर राष्ट्रभक्त युवक यातून निर्माण होतात मात्र ती सवय लहानपणापासून असावी लागते मग ते कार्य धार्मिक असो की राष्ट्रीय असो
याच धार्मिक संस्काराचा वसा कडोळी या छोट्या गावामध्ये निर्माण झाला असून यातून बाल धार्मिक कार्यकर्त्यांनी स्वतःची कीर्तनकारांची आणि सेवाधारी वारकऱ्यांची फळी निर्माण करून संत नगरी कडोळी ते संतनगरी शेगाव असे परमपूज्य रमतेराम महाराज पायी दिंडी सोहळा काढून युवका समोर आदर्श निर्माण केला आहे.

या दिंडी सोहळ्याचे आगमन पातूर येथे झाल्यानंतर पातुर येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर या ठिकाणी या दिंडी सोहळ्याचा मुक्काम झाला यादरम्यान या दिंडी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.

यावेळी शाल श्रीफळ दुपट्टा टोपी घालून दिंडी मालक ह भ प हर्षद महाराज कदम, दिंडी चालक ह भ प रोहन महाराज भांबाडे , दिंडी अध्यक्ष मृदंगाचार्य हभप ऋषिकेश महाराज बोरकर, गायनाचार्य ह. भ. प. पूजा दीदी थोरात आळंदीकर, पुजारी भगवान हमाने आधी प्रमुख या पालखीचे सेवाधारी यांचा सत्कार श्री. सिद्धिविनायक गणपती मंदिर प्रतिष्ठानाच्या वतीने श्री. लक्ष्मणराव ढोणे, सौ. नंदाताई ढोणे, अजय ढोणे, सौ. मनीषा ढोणे, विश्वास ढोणे, कल्पना ढोणे यांच्या वतीने करण्यात आला.

पातुर येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर या ठिकाणी शेगांव ते पंढरपूर , आणि शेगांव ला जाणाऱ्या येणाऱ्या पालखी सोहळ्याचे स्वागताचे आणि राहण्याची ,महाप्रसादाची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून ढोणे परिवार राबवीत आहे.

यावर्षी सुद्धा हा सोहळा पातुर येथे 13 डिसेंबर 2023 रोजी पार पडला आहे. या ठिकाणी बाल कीर्तनकारांनी कीर्तन करून सेवा दिली या सेवेचा लाभ अनेकांनी यावेळी घेतला या ठिकाणी श्री ढोणे परिवाराकडून पालखी सोहळ्यातील सेवाधारी दिंडी सोहळ्यातील आणि भाविकांना महाप्रसादाचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: