न्युज डेस्क – केंद्र सरकार ऑक्टोबरपासून ऑटो कंपन्यांसाठी आठ आसनी वाहनांमध्ये किमान सहा ‘एअरबॅग’ असणे बंधनकारक करण्याचा विचार करत आहे. ही माहिती देताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, वाहनांमधील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले जात आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले होते की, वाहन प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, वाहनांची सुरक्षा वाढविण्यासाठी केंद्रीय मोटर वाहन नियम, 1989 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठ आसनी वाहनांसाठी किमान सहा एअरबॅग अनिवार्य करण्याच्या प्रश्नावर गडकरी म्हणाले.
याशिवाय, गडकरी म्हणाले की, सरकार कार निर्मात्यांना मागील सीटसाठी सीट बेल्ट अलार्म सिस्टम अनिवार्य करण्याचा विचार करत आहे. सध्या, सर्व कार कंपन्यांना फक्त पुढच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांसाठी सीट बेल्टचे ‘रिमाइंडर’ देणे बंधनकारक आहे.
मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास 1000 दंड – केंद्रीय मोटार वाहन नियम (CMVR) च्या नियम 138(3) अंतर्गत, मागील सीटवर सीट बेल्ट न घातल्यास 1000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. तथापि, हा नियम अनिवार्य आहे हे बहुतेकांना माहित नाही. मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीटबेल्ट घातल्याबद्दल वाहतूक पोलिसही दंड आकारत नाहीत.