कोल्हापूर – राहुल मेस्त्री
दि.11 रोजी होणाऱ्या युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य व मूर्ती आणि शिल्प संशोधन संस्था औरंगाबाद शाखा कोल्हापूर आयोजित पळसंबे ता.गगनवावडा जि.कोल्हापूर येथील बौद्ध लेणींचा अभ्यास दौऱ्या संदर्भात मंगळवार दि. ६/०९/२०२२ रोजी गगनवावडा तहसीलदार आणि गगनबावडा पोलिस निरीक्षक यांना या कार्यक्रमात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी भंते धम्मदिप यांनी बौद्ध वारसा आणि त्यासंबंधित प्रश्न व्यवस्थित समजून सांगितले. लेणी अभ्यास दौरा आयोजकांमार्फत सतिश भारतवासी यांनी भूमिका मांडली तर प्रभाकर कांबळे यांनी लेणीविषयी काही ठोकळ मुद्दे समजून सांगितले.तसेच सामाजिक सलोखा आणि पळसंबे मधील बौद्ध बांधवांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी तहसीलदारांनी सर्व मुद्दे समजून घेऊन लेणी अभ्यास दौऱ्यास कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपण एकमेकांना सहकार्य करूया त्याचबरोबर दिपोत्सवास पोलीस संरक्षण दिले जाईल, लेणी आणि परिसराचे पावित्र्य राखावे,
लेणी विषयी पुरातत्व खात्याकडे पाठपुरावा करावा लागेल, येथील सर्व धार्मिक कार्यक्रम सलोख्याने पार पाडावेत अशा सूचना दिल्या पोलिस निरीक्षक म्हणाले आम्ही ही उपस्थित राहू असे आश्वासन दिले.याप्रसंगी महेश बावडेकर, पुंडलिक कांबळे,दिपक कांबळे, शक्ती कश्यप,तानाजी कांबळे ,किरण भोसले,संतोष भोसले यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.