रामटेक – राजु कापसे
रामटेक भंडारा रोड वरील कोदामेंढी गावात भरधाव वेगात मिरची वाहून नेणाऱ्या बोलेरो पीकअप गाडीने बंगला चौकात दुचाकीला धडक देत उडविले. सायंकाळी ०५:३० वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात दोघांचा (आई व मुलाच्या ) यांचा मृत्यू झाला आहे. रामटेक भंडारा मार्गावरील बंगला चौक (कोदामेंढी) हा अपघातप्रवण स्थळ झाला आहे.
एमएच १७ बीवाय ४५४२ क्रमांकाची बोलेरो पीक अप गाडीत चालकाने अरोली येथून मिरची भरली. बोलेरो पीकने दुचाकिला दिलेल्या धडकेत दुचाकी वीस फुटावर हवेत उडाली असून त्यावरील महिला देखील तितक्याच वेगात चेंडू सारखी हवेत उडाली. दुचाकीस्वार दुचाकीसह पलटी झालेल्या बोलेरो पीक अप गाडीच्या खाली दबल्या गेला.
अपघात इतका भयंकर होता की एखाद्या स्फोटा सारखा झालेल्या आवाजाने परिसरातील लोकांनी घटनास्थळी बघ्याची गर्दी केली. बंगला चौकातील सीमेंट रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता. घटनास्थळीच महिलेचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच अरोली ठाण्याचे ठाणेदार निशांत फुलेकर, पोलिस उपनिरीक्षक किशोरकुमार सोनवणे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर कोदामेंढी येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्रात प्रार्थमिक उपचार करून भंडारा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. दोघेची ओळख पटल्यावर दोघेही मृतक नागपुर जिल्ह्यातील परसोडा शितलवाडी रामटेक येथील रहवाशी आहे.
मृतकाची नावे किरत भास्करराव क्षीरसागर (वय ४४ ) व शोभा भास्करराव क्षीरसागर (वय ६२ ) आहे. बोलेरो पीकअपचा चालक साईनाथ मारोती सानप (वय ३५) रा. संगमनेर (जि. अहमदनगर) हा किळकोळ जखमी असून अरोली पोलिसांच्या ताब्यात असुन पुढील कार्यवाही करत आहे