पातुर – निशांत गवई
पातुर तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायत ही विविध भ्रष्ट कामानी होत आहे बदनाम ! या ग्रामपंचायतच्या सचिवाने इ निविदा न काढता परस्पर आठवडी बाजाराचा लीलाव केल्याचे जनसामान्यात चर्चा आहे.
शिर्ला ग्रामपंचायतचे सचिव गजानन डीवरे यांच्या मनमानी कारभाराला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याने या ग्रामपंचायतीचे सचिव गजानन डीवरे यांनी शिरला ग्रामपंचायतीमधील येत असलेल्या आठवडी बाजाराचा इ निवेदा न काढता परस्पर लिलाव करून आलेली रक्कम ही परस्पर खर्च केल्याची ग्रामपंचायत सदस्यांमध्ये कुजबुज सुरू आहे.
याबाबत शिर्ला ग्रामपंचायतचे सचिव यांना संपर्क केला असता गजानन डीवरे यांचा फोन हा नेहमी स्विच ऑफ असून ते शिर्ला ग्रामपंचायतला नेहमी गैरहजर राहतात त्यांच्या मागे मोठे राजकीय व अधिकाऱ्यांची पाठबळ असल्याने ते मनमानी कारभार करीत आहेत.
गजानन डिवरे हे कसूर करताना दोन वेळा त्यांना शासनाने निलंबन केल्याचे सुद्धा माहिती समोर येत आहे. यांचा प्रताप पाहता त्यांचा कारभार हा वादग्रस्त असून या शिर्ला ग्रामपंचायत ची नमुना 1 ते 30 पर्यंतची खातीनिहय चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे.