Friday, January 3, 2025
Homeराज्यअवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई व बोनस जाहीर करा खासदार प्रफुलभाई पटेल...

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई व बोनस जाहीर करा खासदार प्रफुलभाई पटेल यांची सरकारला मागणी…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना प्रफुलभाई पटेल यांनी दिले निवेदन…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

नागपूर येथे महाराष्ट्र शासनाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला देण्यात यावा व शेतकऱ्यांना डीबीटी च्या माध्यमातून 25000 रुपये हेक्टरी मदत जाहीर करण्याबाबदचे निवेदन देऊन खासदार प्रफुलभाई पटेल यांनी देवेंद्र फडणविस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.

मागील काही दिवसापासून अवकाळी पावसामुळे पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांचे धानपिक, धानाच्या कडपा तसेच शेतात असलेले पुजन्यांना अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतात असलेल्या कडधान्याच्या पीकाचे नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण आणि पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानीचा मोबदला देण्यात यावा.

तसेच मागच्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांचा यावर्षी लागणारा मशागतीचा वाढीव खर्च लक्षात घेता डीबीटी च्या माध्यमातून बोनस स्वरूपात 25000 रु हेक्टरी मदत जाहीर करण्यात यावी यासंबंधी खासदार प्रफुल पटेल यांनी देवेंद्र फडणविस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन. यांना निवेदन दिले.

यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार राजू कारेमोरे, आमदार विजय रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, सुनील फुंडे, अध्यक्ष, बिडीसीसी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: