मुंबई – गणेश तळेकर
सहकारी मनोरंजन मंडळ आणि दामोदर नाट्यगृहाचे गिरणगावाशी अतूट नाते. सध्या सुरू असलेल्या दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ बचाव आंदोलनाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी आपल्या दामोदर नाट्यगृहाविषयीच्या आठवणी व्यक्त केल्या, लक्ष्मीकांत बेर्डेसोबत कार्टी प्रेमात पडली, तसेच प्रशांत दामलें सोबत च्या ब्रम्हचारी नाटकांच्या आठवणी सांगितल्या.
दामोदर हॉल मधील त्यांच्या प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असे. कधी एकदा दामोदर नाट्यगृहात पुन्हा प्रयोग लागतोय असे वाटायचे, भालजी पेंढारकर, मा. दत्ताराम, मा. दामले नानासाहेब फाटक आदी मान्यवर पदस्पर्शाने पावन झालेल्या सहकारी मनोरंजन मंडळ आणि दामोदर नाट्यगृह गेली शंभर वर्षे एकमेकांसोबत आहेत.
सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी आपल्या दामोदर नाट्यगृहाविषयीच्या व्यक्त केल्या आठवणी…@VarshaUsgaonker pic.twitter.com/drRmgRa3iV
— Mahavoice News (@MahaVoiceNews) December 6, 2023
लोककलांचे माहेरघर गिरणगावची हक्काची नाट्यसंस्था सहकारी मनोरंजन मंडळ आणि दामोदर नाट्यगृह हे वाचलेच पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली व जाहीर पाठिंबा दिला.