Friday, November 22, 2024
HomeMarathi News TodayAamir Khan | अभिनेता आमिर खान चेन्नईतील मिचॉन्ग वादळात अडकले होते…अशी केली...

Aamir Khan | अभिनेता आमिर खान चेन्नईतील मिचॉन्ग वादळात अडकले होते…अशी केली सुटका…

Aamir Khan | चक्रीवादळ मिचॉन्गने तामिळनाडू आता आंध्र प्रदेशात धूम करीत असून या चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका तामिळनाडूची राजधानी चेन्नईला बसला आहे. या वादळामुळे चेन्नईचे जनजीवन विस्कळीत केले आहे. शहरातील सर्व रस्ते पाण्याने तुडुंब भरले आहेत. वादळाच्या तडाख्यात बॉलीवूड अभिनेता आमिर खान देखील अडकले असल्याचे बातमीने त्यांचा चाहत्यांना चिंतेत टाकले होते मात्र असून त्याची सुटका करण्यात आली आहे. चेन्नईतील बी-टाऊन मध्ये राहत असलेल्या अमीर खान ला सुखरूप बाहेर काढले आहे.

सध्या सोशल मीडियावर चेन्नई शहर पाण्यात बुडाल्याची वेगवेगळी छायाचित्रे समोर येत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये अभिनेता आमिर खान या वादळाच्या तडाख्यातून बचावताना दिसत आहे. चेन्नईतील बी-टाऊन मध्ये राहत असलेल्या आमीर खान यांच्या बंगल्या भोवती पुराचा वेढा असल्याने ते गेल्या २४ तासांपासून बंगल्यात अडकले असून अभिनेता विष्णू विशालही त्याच्यासोबत असल्याचे वृत्त आहे. वादळामुळे आलेल्या या पुरातून दोघांचीही सुटका करण्यात आली आहे.

विष्णू विशाल यांनी माहिती दिली
विष्णू विशालने स्वतः आपल्या X अकाउंटवर काही फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. फोटोंमध्ये विष्णू विशाल, आमिर खान आणि बचाव विभागाचे जवान एकत्र दिसत असून हा सेल्फी फोटो आहे. ही पोस्ट शेअर करताना विशालने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आमच्यासारख्या अडकलेल्या लोकांना मदत केल्याबद्दल अग्निशमन आणि बचाव विभागाचे आभार… आणि सर्व प्रशासकीय लोकांचेही आभार जे सतत काम करत आहेत….

आमिर खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर दिसली होती. तथापि, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच खराब कामगिरी केली, त्यानंतर आमिर खानने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला. त्याचबरोबर आता त्यांना या वादळातून बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, याबाबत आमिरने अद्याप काहीही सांगितलेले नाही.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: