पातूर – निशांत गवई
२६/११/२०२३ रोजी फिर्यादी नामे राजु चेलाजी प्रजापती वय २६ वर्ष रा. आंगडीया सव्र्हींस घर क्र. १०१ गजानन टॉवर शंकर नगर रोड राजापेठ अमरावती हे त्यांचे व्यापाराचे पैसे घेवून ट्रॅव्हल्स ने अमरावती येथून मुंबई येथे जात असता पोलीस स्टेशन पातुर हद्दीतील क्वालीटी धाब्यावर बस थांबल्यानंतर फिर्यादी हे गाडीचे बाहेर आले असता तेवढ्यातच आरोपीतांनी सदर ट्रॅव्हल्स मध्ये प्रवेश करून फिर्यादीची पैश्यांने भरलेले बॅग चोरून फरार झाले होते. वरून पोलीस स्टेशन पातुर येथे अपराध नं ५३२ / २३ कलम ३७९ भा.दं.वि नोंद असून तपासावर आहे.
सदर चोरीची उकल करण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक सो, अकोला यांनी स्थागुशा अकोला यांना आदेशीत केले होते. मा.
पोलीस निरीक्षक श्री. शंकर शेळके, स्थागुशा यांनी त्यांचे अधिनस्त एक पथक तयार करून सदर गुन्हा तपास करीता रवाना करण्यात आले.
पो.नि श्री. शंकर शेळके स्थागुशा. अकोला यांच्या आदेशावरून तसेच मार्गदर्शनाखाली सपोनि श्री कैलास डी.
भगत, पोउपनि गोपाल जाधव व पो. अमंलदार यांनी सदर गुन्हयाचा छडा लावण्यासाठी गोपनिय बातमीदार तसेच तांत्रिक
बाबीच्या आधारे सदर गुन्हा करण्याच्या आरोपी निष्पन्न केले.
स्थागुशा अकोला येथील पथक हे मध्यप्रदेश येथे रवाना होवून त्यांनी ग्राम खेरवा ता मनवार जि. धार येथील आरोपी नामे विनोद विश्राम चव्हाण वय १९ वर्ष रा. लुन्हेरा बुजूर्ग ता. मनावर जि. धार याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेवून गुन्हया सबंधाने विचापूस केली असता, त्याचे राहते घरातुन रोखरक्कम ७९,००,०००/-रु (ऐकोणअंशी लाख रूपये) दोन पंचा समक्ष जप्त करण्यात आले. त्यावरून त्यास त्याचे साथीदार नामे रहेमान.