Friday, November 22, 2024
Homeक्रिकेटIND vs AUS | भारताने ऑस्ट्रेलियाचा २० धावांनी पराभव करून T20 मालिका...

IND vs AUS | भारताने ऑस्ट्रेलियाचा २० धावांनी पराभव करून T20 मालिका जिंकली…

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना भारताने 20 धावांनी जिंकला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 174 धावा केल्या. प्रत्युत्तरात कांगारूंचा संघ 154 धावांवर गारद झाला आणि सामन्यासह मालिकाही गमावली.

या विजयासह भारताने मालिकाही जिंकली आहे. टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना ३ डिसेंबरला बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 174 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 7 गडी गमावून केवळ 154 धावा करू शकला आणि 20 धावांनी सामना गमावला.

भारताकडून रिंकू सिंगने सर्वाधिक ४६ धावा केल्या. यशस्वी जैस्वालने 37 आणि जितेश शर्माने 35 धावांचे योगदान दिले. रुतुराज गायकवाड 32 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियातर्फे बेन डॉरिसने तीन तर तनवीर संघा-जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. एरॉन हार्डीला एक विकेट मिळाली. या सामन्यात टीम इंडियाला शेवटच्या दोन षटकात केवळ 13 धावा करता आल्या आणि पाच विकेट गमावल्या. त्यामुळे भारताची धावसंख्या 200 धावांच्या जवळपास पोहोचू शकली नाही.

ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक नाबाद 36 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने 31 आणि मॅथ्यू शॉर्टने 22 धावांचे योगदान दिले. बेन मॅकडरमॉट आणि टीम डेव्हिडने प्रत्येकी 19 धावांचे योगदान दिले. भारताच्या विजयात फिरकी गोलंदाजांनी सर्वाधिक योगदान दिले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या चार विकेट भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या. अक्षर पटेलने तीन आणि दीपक चहरने दोन गडी बाद केले. रवी बिश्नोई आणि आवेश खान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. मात्र, भारतीय फिरकीपटूंनी अतिशय संयमी गोलंदाजी केली आणि अक्षर-रवीने मिळून आठ षटकांत ३३ धावा देत चार बळी घेतले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: