सांगली – ज्योती मोरे
सांगली जिल्ह्याचे पोलीसअधीक्षक दीक्षित गेडाम यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांनी सांगली जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना मागील पाच वर्षातील गणेशोत्सव दरम्यान दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे तसेच सणासुदीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारे अशांतता निर्माण करणाऱ्या इसमानवर तसेच टोळ्यांवर तडीपारी कारवाई प्रस्ताव पाठवण्याबाबत आदेश दिले होते.
त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक यांच्याकडे गणेशोत्सवामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवणारे तसेच अशांतता निर्माण करणाऱ्या एकूण नऊ टोळ्यांमधील 39 इसमांवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमार्फत हद्दपारी प्रस्ताव पाठवण्यात आले होते.
त्यामध्ये पोलीस अधीक्षक दीक्षित दीक्षित गेडाम यांनी सदर प्रस्तावाची सलग सुनावणी घेऊन त्यांना बचावाची संधी देऊन कायद्यातील तरतुदी प्रमाणे यातील पाच टोळ्यांमधील 17 इसमांना कायदेशीरपणे सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. तसेच इतर टोळ्यांवर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 प्रमाणे गुन्हे करण्याच्या बेतात असणाऱ्या 16 इस्मान व दोष सिद्धी झालेल्या एका इसमाविरुद्ध कलम 57 प्रमाणे संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठवलेल्या हद्दपार प्रस्तावाची कार्यवाही सुरू आहे. एम पी डी एफ प्रमाणे एका इसमाविरुद्ध माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाई सुरू आहे.
याचबरोबर पोलीस अधीक्षकांनी गणेशोत्सव काळात सांगली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालयांना प्रतिबंधात्मक कारवाईचे कॅम्प घेऊन जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने प्रतिबंधात्मक कारवाया करण्याबाबत गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी सांगली यांना आदेशित केले होते.
त्याप्रमाणे सतीश शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालयाच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाईसाठी कॅम्प आयोजित करून यापूर्वीच्या गणेशोत्सव काळात गुन्हे दाखल असलेल्या इसमांवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर तसेच कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकतील अशा इसमानवर कायद्यातील तरतुदीप्रमाणे गुणात्मक प्रतिबंधक कारवाया केल्या आहेत.
या कॅम्पमध्ये सीआरपीसी कलम 107 प्रमाणे 554 इसमानवरती चॅप्टर केस दाखल करून त्यातील 404 इसमांकडून चांगल्या वर्तणुकीचा एक वर्ष मदतीचा फायनल बॉण्ड जामीनसहित घेण्यात आला आहे.उर्वरित इसमांकडून अंतरिम बाँड घेण्यात आलेले आहेत. तसेच सीआरपीसी कलम 110 प्रमाणे 138 इस्मान वरती चॅप्टर केस दाखल करून त्यातील 85 समान कडून चांगल्या वर्तणुकीचा एक वर्ष मदतीचा फायनल बॉण्ड जामीनसह घेण्यात आला आहे.
उर्वरित इसमांकडून अंतरिम बाँड घेण्यात आलेले आहेत. तसेच सांगली जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे गणेशोत्सव काळात 107 प्रमाणे 986 केसेस 108 प्रमाणे एक केस 109 प्रमाणे 21 केसेस 110 प्रमाणे 31 चॅप्टर केसेस पाठवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.