Friday, September 20, 2024
HomeBreaking NewsWeather Update | ऐन हिवाळ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस...

Weather Update | ऐन हिवाळ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस…

Weather Update : राज्यात अनेक जिल्ह्यांत काल आणि आज अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. हिवाळ्यात थंडीचे दिवस सुरु असताना अचानक अवकाळी पावसाने हरभरा, तूर पिकांना फटका बसणार असल्याने शेतकरी चितेत सापडला आहे. काल अनेक जिल्ह्यात पावसाचा गारपीट आणि वादळीवाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळला. तर आज सकाळी सोमवारी पावसाचा जोर कायम राहणार आहे. यामुळे हिवाळ्यात पावसाचा अनुभव राज्यातील नागरिकांना येत आहे.

पावसामुळे गारठा, अनेक जिल्ह्यांत रिपरिप
विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. यवतमाळ जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाची रिपरिप सुरूच आहे. तर अमरावतीमध्ये आज सकाळ पासून मध्यम ते हलक्या सरीचा पाउस सुरु आहे. हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आहे. विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरूच आहे. वाशिम जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह रात्री एक वाजता अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसामुळे तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तुरीचे पीक सध्या फुलोरा अवस्थेत असल्याने पावसामुळे फुलगळ होणार आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. तर इतर फळं आणि भाजीपाला पिकाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मागच्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला. तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी भुईसपाट झालीय. मंचर परिसरात वादळीवा-यासह पाऊसाची दमदार बँटीग झाली. मुंबईमध्ये पावसाचे वातावरण कायम आहे. नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मध्यरात्रीपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे.

हिवाळी मोसमी वारे व चक्रीय वाऱ्यांच्या परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात पाऊस पडत आहे. राज्यातील परभणी, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. राज्यात सोमवार आणि मंगळवारी पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: