रामटेक – राजु कापसे
दिनांक 25 नोव्हेबर 2023 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प तालुका रामटेक व परीवर्तन विचार मंच, रामटेक यांच्या वतीने 74 व्या संविधान दिनाच्या निमित्ताने तालुकास्तरीय संविधान प्रश्नमंजुषा स्पर्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्पर्धेत कृती फेरी, स्पष्टीकरण फेरी, बौद्धिक प्रश्न फेरी,झटपट नाद फेरी व विस्तार फेरी अश्या पाच फेरी घेण्यात आल्या. स्पर्धेत संविधानावर आधरीत एकूण 57 प्रश्न विचारण्यात आले.
विद्यार्थ्यांना एमपीएससी व यूपीएससी करीता उपयुक्त अशी माहिती सदर कार्यक्रमात देण्यात आली. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्याय मंडळ असे तीन महाविद्यालयांचे वेगवेगळे गट बनविण्यात आले.हसत खेळत ज्ञान या पद्धतीने रामटेक तालुका समतादूत राजेश राठोड यांनी संचलन केले.
कार्यक्रमाला जनप्रभा महाविद्यालयाचे प्राचार्य सत्यजीत खताळ, उपप्राचार्य लहू झूरे यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाला परीवर्तन विचार मंचचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे व कोषाध्यक्ष राहुल जोहरे यांची विशेष उपस्थिती होती.त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि संविधानाचे आपल्या जीवनात असलेले महत्त्व याबाबत ज्ञान अवगत करून दिले.
मौदा तालुका समतादूत दुर्योधन बगमारे व राहुल जोहरे यांनी प्रश्न मंजुषा स्पर्धेचे परीक्षक म्हणून महत्वपूर्ण भूमिका चोखपणे पार पाडली.प्रथम क्रमांक रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय, रामटेकचे कायदे मंडळातील तृप्ती बालपांडे,बंटी चौरे व आयुष वासनिक यांनी पटकावला.द्वितीय क्रमांक श्री नरेंद्र तिडके महाविद्यालय, रामटेकचे कार्यकारी मंडळातील कुणाल पन्नासे,करिष्मा सारंगपुरे व करण ठाकरे यांनी तर तृतीय क्रमांक जनप्रभा प्रशासकीय महाविद्यालय, भोजापूर -रामटेक यांनी पटकावला.परीवर्तन विचार मंचाच्या वतीने विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व काम्रेड गोविंद पानसरे लिखीत ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
प्रेक्षकातून उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांना संविधान उद्देशिकेची शासकीय प्रत व पुस्तके देऊन गौरविण्यात आले यात टेंभूर्णकर मॅडम, विरू आष्टनक, श्रूती हिंगे,सलोनी वाघमारे व निवेदिता रेवतकर यांनी बक्षिसे पटकावली.स्पर्धेची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून व महाराष्ट्र गीताने करण्यात आले व सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
यावेळी शिक्षक कोमल गराडे,णविनी येतुकर, ऐश्वर्या चकोले, इम्रान खान,अंशुल जयस्वाल,विद्या कोठाळे,प्रेरणा धमगाये व किरण वाडीभस्मे आणि असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. सदर उपक्रमासाठी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विभाग प्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, निबंधक इंदिरा अस्वार, विभागीय प्रकल्प अधिकारी जागृती गायकवाड, प्रकल्प सह व्यवस्थापक नसरीन तांबोळी आणि नागपूर जिल्हा प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले तसेच जनप्रभा महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष डॉ. रामचंद्र जोशी व सचिव डॉ. ललिता चंद्रात्रे यांचे मार्गदर्शन लाभले.