सांगली – ज्योती मोरे
राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक आणि सांगली जिल्हा पोलीस दलाच्या मार्गदर्शनानुसार रस्ते अपघातातील मृतांना मेणबत्ती लावून श्रद्धांजली देत त्यांच्या नातेवाईकांचं मनोबल वाढवण्यासह अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित करत रस्ता सुरक्षा नियमांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस ,सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ सांगली सिटी आणि आभाळमाया फाउंडेशन आदींच्या सहकार्याने सांगलीतील पुष्पराज चौकामधील अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सांगलीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्लीचे संचालक बाळासाहेब कलशेट्टी यांनी केले आहे.
त्याचबरोबर रस्ता सुरक्षितते संदर्भातील नियमांच्या प्रचार आणि प्रसारासाठी एक चित्रफितही प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती कलशेट्टी यांनी दिली आहे.