- शोभायात्रेच्या आयोजनासाठी एकवटली माणुसकी
- यंदा होणार ४२ वी शोभायात्रा
- पक्षभेद सोडुन राजकियांचा सामुहीक पुढाकार व हातभार
रामटेक – राजू कापसे
प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामनगरीमध्ये दरवर्षी त्रिपुरा पोर्णिमा दरम्यान भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत असते मात्र कोरोना महामारीच्या मागील बिकट व गंभीर संकटामुळे या कार्यक्रमावर कोव्हीड – १९ नियमांचे विरजन पडलेले होते यामुळे नागरीकांची घोर निराशा झालेली आहे. शोभायात्रेमध्ये ५० च्या जवळपास झाक्यांचा समावेश राहात असतात व हे दृष्य पहाण्यासाठी शहरासह आसपाच्या गावातील हजारो लोक यावेळी येथे आपली हजेरी लावत असतात.
यंदा भव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार असल्याचे भारतीय जनसेवा मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.रामनगरीतील शोभायात्रा दुरवर प्रसीद्ध आहे. शहरामध्ये या वर्षी ४२ व्या शोभायात्रेचे येत्या २५ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता आयोजन करण्यात आलेले आहे. भारतीय जनसेवा मंडळाद्वारे सदर शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले असुन या मंडळाचे अध्यक्ष सृष्टी सौंदर्य परीवार चे ऋषिकेश किंमतकर हे आहेत. शोभायात्रेचे मुख्य आकर्षन प्रसीद्ध चित्रपट अभिनेते राकेश बेदी असणार आहे.
शोभायत्रेची सुरुवात स्वर्गीय संत गोपाल बाबा यांनी केली, त्यांनी तब्बल ३९ वर्षे ती उत्तम प्रकारे चालवली. भारतीय जनसेवा मंडळाच्या मार्गदर्शनाखाली शोभायात्रा समिती स्थापन करण्यात आली आहे. वैकुंठ चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला दरवर्षी झाक्यांची शोभायात्रा निघते. या झांक्या अठराभुजा गणेश मंदिरापासून निघेल व लंबे हनुमान मंदिरामार्गे जात पुढे नेहरू मैदानावर समापन होईल.
शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी संत तुकाराम महाराज, भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष, ऋषीकेश किंमतकर यांचेसह चंद्रपाल चौकसे, डी.मल्लिकार्जुन रेड्डी, यांचेसह अनेक नागरीक प्रयत्नशील आहेत. यानंतर त्रिपुरी पौर्णिमा असून रथयात्राही निघणार आहे. यानंतर मंडईचे कार्यक्रम सुद्धा होणार आहेत. परगावी असलेल्या विवाहित मुली त्रिपुरी पौर्णिमेला येतात माहेरीविशेष बाब म्हणजे येथील शोभायात्रा, रामरथयात्रा तथा मंडई जत्रा साठी नागरीकांची मोठी गर्दी येथे होत असते.
दरम्यान स्थानीक नागरीकांचे बाहेरगावी असणारी आप्तमंडळी तथा बाहेरगाववरून मोठ्या संख्येने नागरीक येथे सदर भव्य कार्यक्रमासाठी येत असतात. त्यामुळे शहराला जत्रेचे स्वरूप येत असते. लग्न होऊन परगावी वास्तव्यास गेलेल्या विवाहित मुली सुद्धा येथे म्हणजेच आपल्या माहेरला याच त्रिपुरी पोर्णिमा दरम्यान रामटेक ला येत असतात हे विशेष. …आणि पक्षभेद सोडुन एकवटली राजकीय मंडळीस्वर्गीय संत गोपालबाबा हे या शोभायात्रा कार्यक्रमाचे निर्माते होते.
त्यांनी तब्बल ४१ वर्षापुर्वी या भव्य शोभायात्रा कार्यक्रमाचा शुभारंभ केला होता. शोभायात्रेचे संपुर्ण नियोजन ते मोठ्या कुशलतेने करायचे मात्र गोपालबाबा यांच्या निधनानंतर आता शोभायात्रा कार्यक्रमाचे आयोजन कसे करायचे असा भला मोठा बिकट प्रश्न रामटेकवासीयांपुढे तथा भारतीय जनसेवा मंडळाच्या सदस्यांपुढे येऊन ठेपला होता.
मात्र खरंच माणुसकी एकवटल्याचे चित्र दिसुन आले. राजकियांसह शहरातील दिग्गज व प्रतिष्ठीत नागरीकांची बैठक झाली व शोभायात्रा काढायचीच व त्यासाठी सहकार्याचा हात द्यायचा असे ठरले. विविध पक्षातील राजकिय हेवेदावे तथा पक्षभेद सोडुन एकत्र आले, देणगीसाठी अनेकांनी हात सैल सोडला व शोभायात्रा कार्यक्रम नियमीत झाला. सध्या शोभायात्रा कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.