Saturday, October 26, 2024
Homeराज्यनागपुर | डॉ. बालचंद्र खांडेकर अनंतात विलीन...

नागपुर | डॉ. बालचंद्र खांडेकर अनंतात विलीन…

नागपुर – शरद नागदेवे

नागपुर -बौद्ध धम्म व पालीचे गाढे अभ्यासक पाली विभूषण डॉक्टर भालचंद्र खांडेकर यांचे काल निधन झाले आज त्यांच्या पार्थिवावर वैशाली घाटावर शेकडो चाहत्यांच्या उपस्थितीत अग्नी संस्कार करण्यात आले.

भदन्त विमलकित्ती गुणसिरी यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा संपन्न झाली. शोकसभेत प्रा. अशोक गोडघाटे, प्रा. रणजीत मेश्राम, प्रा. जानराव गजभिये, डॉ. नितीन राऊत, मा. उत्तम शेवडे यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या.

याप्रसंगी भदंत नागदीपंकर, भदंत महापंत, डॉ भदंत शीलवन्स, डॉ भदंत मेत्तानंद, भंते धम्मशिखर, भंते पैयासिरी, माजी आमदार उपेंद्र शेंडे, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, मा. शशिकांत हूमणे, मा. गोपाळ आटोटे, डॉ. सरोज आगलावे, भूपेश थुलकर, नागेश चौधरी, दादाकांत धनविजय, ई. मो. नारनवरे, का. रा. वाल्देकर, बबन चहांदे, विलास गजघाटे, डॉ. सिद्धार्थ गायकवाड,

डॉ. बी. जी. मेश्राम, भीमराव वैद्य, डॉ. शंकर खोब्रागडे, मोहन वासनिक, प्राचार्य यशवंत पाटील, नागदेवे मॅडम, डॉ. सुचित बागडे, डॉ. बाबा वाणी, डॉ. मालती साखरे, डॉ. सरोज डांगे, अमन कांबळे, दुर्वास चौधरी, बाळू घरडे, रवी गजभिये, मारोतराव कांबळे, डॉ. टी. जी. गेडाम, आनंद डेकाटे, अतुल खोब्रागडे, प्रेमकुमार उके, जिंदा भगत, सुधीर भगत, मा. वसंत खोब्रागडे, मा. किशोर गजभिये ,

बी. जी. गजभिये, डॉ. मच्छिंद्र चोरमारे, डॉ. प्रज्ञा बागडे, ऍड रमेश शंभरकर, डॉ तुळसा डोंगरे, तक्षशिला वाघधरे, नरेश वाहने, नरेश साखरे, अशोक सरस्वती, डॉ राजेंद्र फुले, प्रा. रंजना कवाडे, न्यायमूर्ती सी. एल. थूल, डी. डी. थूल, प्रेम सागर गणवीर, जितेंद्र घोडेस्वार, आचार्य सुधाकर चौधरी, डॉ. सुदेश भोवते यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते.

या शोकसभेचे सूत्रसंचालन पाली विभाग प्रमुख डॉक्टर नीरज बोधी यांनी तर उपस्थितांचे आभार खांडेकर परिवाराच्या वतीने बालचंद्र खांडेकर यांचे मोठे बंधू ताराचंद खांडेकर यांनी केला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: