रामटेक – राजु कापसे
रामटेक तालुक्यातील देवलापार येथे शाहिस्ता पठाण (माजी सरपंच देवलापार) यांच्या संकल्पनेतून महिला स्वयंरोजगार संघ द्वारा सुरु करण्यात आलेल्या महिला स्वयंरोजगार केंद्राच्या उदघाटन सोहळ्याला मा.श्री.राजेंद्र मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपुर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांनी उपस्थित राहून महिला भगिनींशी संवाद साधला व त्यांच्या या उपक्रमाला यशस्वी करण्याकरिता प्रथम ऑर्डर मिळवून दिले. श्रीमती. शांताताई कुमरे (जि.प. सदस्य), श्री. प्रविण उईके (सरपंच, पिपरिया ग्रा.पं), श्री. मुकेश पेनदाम, सौ. शिल्पाताई पेंदाम( सदस्य देवळापार ग्रा.पं), श्री. कैलास निघोट, श्री. जब्बार सर, श्री. आरिफ भाई,श्री. मोईन पठाण, श्री. सलमान अजमेरी, श्री. अदालिफ पठाण व इत्यादी मान्यावर व महिलागण उपस्थित होते.