Tuesday, October 22, 2024
HomeBreaking NewsYavatmal | भररस्त्यात शिवसैनिकाची हत्या!...वाघाडी जांब येथील घटना...आरोपी पसार

Yavatmal | भररस्त्यात शिवसैनिकाची हत्या!…वाघाडी जांब येथील घटना…आरोपी पसार

Yavatmal : यवतमाळ शहरालगतच्या वाघाडी जांब येथे शिवसैनिकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. जागेवरच त्या शिवसैनिकाचा मृत्यू झाला होता. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. योगेश नरहरी काटपेलवार (३६) रा. देवीनगर लोहारा असे मृताचे नाव आहे.

अज्ञात आरोपींनी भररस्त्यात योगेश वर चाकूने सपापसप वार केले. या घटनेत योगेश जागीच मृत्यू झाला आहे. योगेशचा खून जुन्या वादातून झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. योगेश यांचा मृतदेह घटनास्थळावरून शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

पोलिसांनी तत्काळ तपास हाती घेत मारेकरी कोण याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. शिवाय घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेल्या एका संशयितासह महिलेलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ करीत आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: