Friday, November 22, 2024
Homeक्रिकेटAUS vs SA | म्हणून दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत हरली का?...हा व्हिडिओ...

AUS vs SA | म्हणून दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत हरली का?…हा व्हिडिओ होत आहे व्हायरल…

AUS vs SA : क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार काल गुरुवारी दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत पाहायला मिळाला. पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. त्यानंतर अखेरच्या क्षणी कर्णधार पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांच्यातील समंजस खेळीने सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकता आला असता, पण क्विंटन डी कॉकने ही संधी गमावली.

वास्तविक, दक्षिण आफ्रिकेच्या 7 विकेट पडल्या होत्या. विजयासाठी प्रत्येक धावांची धडपड सुरू होती, त्याच दरम्यान 45 व्या षटकात 8 धावा काढून खेळत असलेल्या पॅट कमिन्सला दुसरा चेंडू टाकला, तेव्हा त्याच्या बॅटची कड लागली आणि तो विकेटकीपर क्विंटन डी कॉकच्या दिशेने गेला. डी कॉकला हा झेल पकडता आला नाही.

हे अवघड असले तरी, अशा क्षणी हा झेल पकडला असता तर दक्षिण आफ्रिकेला मोठी विकेट मिळाली असती, तर 8 विकेट पडल्यानंतर ऑस्ट्रेलियावरही दडपण निर्माण झाले असते. मात्र, तसे होऊ शकले नाही आणि कमिन्स बाद होण्यापासून बचावला. हा झेल सोडल्यानंतर मार्कराम खूपच निराश दिसत होता. त्याची प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अवघ्या काही तासांत डी कॉकचा कॅच ड्रॉपचा व्हिडिओ 65 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे क्षेत्ररक्षण चर्चेत होते. बावुमा आणि डी कॉकला झेल पकडता आला नाही. याशिवाय दक्षिण आफ्रिकेने अनेक संधी गमावल्या. फायनलच्या इतक्या जवळ जाण्यात क्षेत्ररक्षणाचा मोठा वाटा होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या सामन्यासह क्विंटन डी कॉकची वनडे कारकीर्दही संपुष्टात आली. डी कॉकने विश्वचषकापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: