ACB Trap : वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील माहुली गावातील महिला सरपंचासह एका इसमाला १३ हजाराची लाच घेताना वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या टीमने रंगेहात पकडले आहे. सौ.गौकर्नाबाई विष्णू राठोड, वय 50 वर्ष पद सरपंच ग्राम माहुली व 2) विष्णू मंगु राठोड. वय 55 वर्षे, खाजगी इसम दोन्ही रा. माहुली, ता मानोरा, जि. वाशिम. असे पकडण्यात आलेल्यांची नावे असून त्यांच्या विरुद्ध मानोरा पोलीसा ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
वाशीम ACB ने दिलेल्या माहिती पत्रात 30 वर्षीय तक्रारदार यांचे एक घरकूल तसेच त्यांचे नातेवाईक यांचे एक घरकुल असे दोन घरकुलच्या फाईलवर सही करण्याकरिता 4000 रु तसेच तक्रारदार यांचे नातेवाईक यांचे दोन विहिरीच्या फाईलवर सही करण्याकरिता 10000 रु असे पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपी क्र.1 व 2 यांनी 14000 रु ची मागणी करून तडजोडी अंती 13000 रु स्वीकारण्याचे मान्य केले. सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी क्र.2 यांनी 13000 रु लाच रक्कम स्वीकारली. आरोपी यांचेविरुद्ध पोस्टे मानोरा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सक्षम अधिकारी
मा. विभागीय आयुक्त सा. अमरावती
सापळा व तपास अधिकारी
श्री. बालाजी तिप्पलवाड,
पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. वाशिम.
7020155311
पर्यवेक्षण अधिकारी
श्री.गजानन शेळके,
पोलीस उपअधीक्षक,
ला.प्र.वि. वाशिम.
सापळा कार्यवाही पथक
श्री. बालाजी तिप्पलवाड पोलीस निरीक्षक, सुजित कांबळे, पोलीस निरीक्षक,
ए एस आय /दुर्गादास जाधव,पोहवा असिफ शेख, राहुल व्यवहारे, पोना. संदिप इडोळे, समाधान मोघाड, चालक मिलींद चन्नकेसला सर्व नेमणूक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम.
मार्गदर्शन –
१) मा. श्री.मारूती जगताप, पोलीस अधीक्षक ,
२) मा. श्री देविदास घेवारे, अप्पर पोलीस अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
सर्व नागरीकांना आवाहन कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, वाशिम पोलीस उप अधीक्षक
@दुरध्वनी क्रं – 07252 235933
@टोल फ्रि क्रं 1064
मोबाईल क्र.7020155311.