गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
काल महामानव क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 148 जयंती समारोह निमित्ताने मौजा बोरीटोला, बोरगाव, मारेगाव, पुजारीटोला, सिल्ली आदी गावात ध्वजारोहण सोहळा सह आयोजित विविध कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहुन रविकांत (गुड्डू) बोपचे यांनी क्रांतिसूर्य, भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व जनजातीय गौरव दिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
यावेळी मार्गदर्शन करतांना रविकांत बोपचे यांनी सांगितले की, ब्रिटीश सरकार व जमीनदारी काळात आदिवासी समाजाचे शोषण व्हायचे. शोषणाविरुद्ध आदिवासी समाजात जागृती करून विविध क्रांतिकारी चळवळीच्या माध्यमातून महामानव, जननायक बिरसा मुंडा यांनी आवाज उठवत त्यांनी जल, जंगल, जमीन च्या रक्षणासाठी व हक्कासाठी बलिदान दिले व आदिवासी समाजातील पहिले स्वातंत्रवीर ठरले, त्यांचे संघर्षमय व क्रांतिकारी जीवन आजच्या व पुढच्या पिढीला प्रेरणा देणारा आहे, असे प्रतिपादन केले.
यावेळी मौजा बोरीटोला येथे सरपंच ज्योतीताई कुंभारे, उपसरपंच कमलेश बारेवार, ग्यानिराम मेश्राम, देवचंद धूर्वे, कुवरचंद राऊत, बंडू मसराम, मौजा पुजारीटोला येथे जि .प .सदस्य किरण पारधी, सरपंच निर्मला काटूके, योगेश टेंभरे, अनिल मरसकोल्हे, मुलचंद राणे, दिनेश नंदरधने, प्रियांका नागरीकर, वंदना नागरीकर, कुवरलाल नागरीकर,
भैयालाल नागरिकर, मौजा मारेगाव येथे दुर्गेश कळपती, इंद्रकुमार ठाकरे, भाऊराव रहांगडाले, मनोज तीलगामे, संजय कंगाली, हीवराज भलावी, बिंदुपाल सलामे मौजा सिल्ली येथे भारत बावनथडे, रामकुमार असाटी, शामराव उईके, सरपंच शुभाष वडीचार, विष्णू उईके, मुकेश भांडारकर, राकेश सोयाम, उपसरपंच विनोद परतेती सहीत मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.