Sunday, July 21, 2024
spot_img
Homeराज्यअमरावती | अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार...SRPF कॅम्प जवळील घटना...

अमरावती | अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार…SRPF कॅम्प जवळील घटना…

अमरावती : मागील आठवड्यात शहरातील मंगलधाम परिसरात दोन बिबट्याचा मुक्तपणे संचार करीत असल्याने या भागात दहशत पसरली होती. तर आज फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोहरा रोड एसआरपीएफ कॅम्प जवळ सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर बिबट्याचा मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाची घटनास्थळी दाखल झाली. वनविभागाच्या टीमने जागेचा पंचनामा करून मृत बिबट्याला सोबत घेवून घेले.

प्राथमिक माहितीनुसार, बिबट्याला रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाची धडक बसली असावी, त्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला. उल्लेखनीय म्हणजे शहरातील मंगलधाम परिसरातील निर्मलधाम बिल्डींग जवळ दोन बिबट्या मुक्तपणे संचार करीत असताना CCTV च्या कॅमेऱ्यात दिसले होते. याशिवाय विद्यापीठाच्या परिसरात झाडाझुडपात बिबट्या दिसल्याची घटना अजून जुनी झालेली नाही.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: