राजु कापसे
रामटेक
रामटेक:- सुरज मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा काचुरवाही येथे ६ नोव्हेम्बरला किट्सचे प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, डीन डॉ. पंकज आस्टनकर, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. उद्धल हटवार यांनी भेट दिली व ७० टी-शर्ट आणि मुलाना मिठाई वाटप केले. तसेच मुलांशी हितगुज केली. या वेळी सुरज मतीमंद शाळेचे मुख्याध्यापक तुलसीदास जुनघरे, संस्था सहसचिव अलका घोल्लर,शिक्षक अमोल खडोतकर, कृष्णकांत जांगडे, प्रियंका मुंडले, सहित आदि उपस्थित होते.
किट्सचे प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे म्हणाले की मतिमंद मुलाना शिक्षण देने व त्यांची काळजी घेणे ही महान मानवतेची सेवा आहे. संचालन प्रविण मडावी व आभार प्रशांत चरपे यानी केले.