Snakes Poison : उत्तर प्रदेशातील नोएडातील सेक्टर-49 कोतवाली परिसरात सेक्टर-51 मधील सेफ्रॉन वेडिंग व्हिला येथे आयोजित रेव्ह पार्टीसाठी सापाच्या विषाची तस्करी करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेवेळी स्थानिक पोलिसांसह वनविभागाचे पथकही उपस्थित होते. आता या प्रकरणी एक मोठे अपडेट समोर आले आहे. अटकेनंतर चौकशीदरम्यान सेलिब्रिटी आणि बिग बॉस विजेता एल्विश यादवचे नाव पुढे आले आहे. हे नाव समोर आल्यानंतर नोएडा पोलिसांनी एल्विशविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका एनजीओने स्टिंग ऑपरेशन केले आणि नोएडा पोलिसात तक्रार दाखल केली.
6 तस्करांना अटक, 9 विषारी साप जप्त
या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की, सहा तस्करांना अटक करताना पोलीस आणि वनविभागाच्या संयुक्त पथकाने त्यांच्याकडून पाच कोब्रा, दोन डोक्याचे साप, एक लाल नाग आणि एक अजगर पकडला आहे. आरोपींकडून प्लास्टिकच्या बाटलीतील 25 एमएल सापाचे विषही जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, अटकेवेळी तस्करांकडून जप्त केलेल्या बॅगेत वेगवेगळ्या कप्यात एकूण 9 साप आढळून आले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तस्करांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान घटनास्थळी उपस्थित वनविभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रेव्ह पार्ट्यांमध्ये नशा करण्यासाठी सापाच्या विषाचा वापर केला जातो.
तस्करांची चौकशी सुरू असून, लवकरच आणखी अटक होण्याची शक्यता आहे
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तस्करांना अटक करताना घटनास्थळावरून एका व्यक्तीलाही पकडण्यात आले, ज्याला सापाचे विष देण्यात आले होते. त्याचबरोबर अटक करण्यात आलेल्या तस्करांची सेक्टर-49 कोतवाली पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान या टोळीतील इतर लोकही सक्रिय असल्याची माहिती समोर येत असून, त्यांना लवकरच अटक केली जाऊ शकते. अटक करण्यात आलेले सक्रिय सर्प तस्कर हे मेट्रो सिटीमध्ये होणाऱ्या रेव्ह पार्ट्यांमध्ये विषारी सापांचे विष पुरवून लाखोंची कमाई करत असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. एवढेच नाही तर अटकेत असलेल्या तस्करांनी पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले की, ते आजूबाजूच्या जंगलातून नव्हे तर राष्ट्रीय उद्यानातून प्रतिबंधित प्रजातीचे अजगर पकडायचे आणि नंतर त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री करायचे.
उत्तर प्रदेशातील इतर जिल्ह्यांशी तस्करांचे संबंध आहेत
आरोपींची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी दहा ग्रॅम विषाच्या बाटलीची किंमत एक लाख रुपयांहून अधिक असल्याचे उघड केले. सापाच्या विषाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत करोडो रुपये आहे. ही टोळी सापाच्या विषासोबतच सापांची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. साप विकण्यापेक्षा रेव्ह पार्ट्यांना विष पुरवणे हा मोठा व्यवसाय असल्याचे तपासात समोर आले आहे. एवढेच नाही तर विषाच्या तस्करीचे दुवे गाझियाबाद आणि मथुरेच्या तस्करांशी जोडलेले आहेत. हे तस्कर गाझियाबाद येथील एका व्यक्तीला सापाचे विष पुरवायचे, असे तपासात समोर आले आहे. आता पोलीस त्या व्यक्तीचाही शोध घेत आहेत.
FIR against Youtuber #ElvishYadav and his 5 associates. Rahul, Titunath, Jayakaran, Narayan, Ravinath are currently in custody.
— Mohammed Zubair (@zoo_bear) November 3, 2023
According to the FIR, 20 ml of Snake venom, 9 poisonous snakes were found from them ( 5 cobra, 1 python, 1 two-headed snake, 1 Rat Snake). According… pic.twitter.com/3ZQKtkEFpn