Wednesday, October 30, 2024
Homeराज्यभाजपा आमदार किसन कथोरे यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न…

भाजपा आमदार किसन कथोरे यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न…

आमदार कथोरे यांनी शिवीगाळ केल्याचा मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलनकर्त्यांचा आरोप…

आमदार कथोरे यांची गाडी दिसेल तेथे फोडू… संतप्त मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांचा इशारा…

ठाणे – प्रफुल्ल शेवाळे

ठाणे जिल्यातील मुरबाड विधानसभा चे भाजपा आमदार किसन कथोरे हे काही कामानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता मराठा क्रांती मोर्चा च्या आंदोलनकर्त्यांनी कथोरे यांच्या गाडीसमोर झोपून त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला… पण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तैनात असणाऱ्या पोलिसांनी आंदोलनकर्त्याना हटवून लावले…

आम्हाला मराठा आरक्षण संबंधात आमदार कथोरे यांच्या सोबत बोलायचे होते.. पण आमदारांनी या संदर्भात कोणतेही चर्चा करण्यास नकार दिला.. यावेळी मराठा आंदोलनकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी आमदारांच्या गाडीसमोर स्वतःला झोकून दिले.. आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी हटविल्यानंतर आमदारांनी यावेळी आपल्याला शिवीगाळ केली असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला..

आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत आणि आमदारांना आमच्यासोबत बोलण्यासाठी वेळ नाही, अशा आमदाराची गाडी जेथे दिसेल तेथे फोडून टाकू असे संतप्त विधान आंदोलनकर्ते करीत असताना दिसत होते.. मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण मिळविण्याच्या भूमिकेवर संपूर्ण राज्यभर विविध आंदोलन होताना दिसत आहेत..

Prafulla Shewale
Prafulla Shewalehttp://mahavoicenews.com
मी, प्रफुल्ल शांताराम शेवाळे, रा. टिटवाळा ता. कल्याण जि. ठाणे, पदवी - विद्युत अभियंता, विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात 20 वर्षे अनुभव. पत्रकारिता गेल्या 7 वर्षापासून करतो, मी महाव्हाईस न्यूज ला गेल्या पाच वर्षापासून परिसरातील बातम्या देण्यासाठी नेहमीच सहकार्य करतो...
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: