रामटेक – राजु कापसे
ग्रामीण भागातील गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या दहावी बारावी उत्तीर्ण आणि पदवीधर झालेल्या हुशार- होतकरू तरुण तरुणींसाठी विविध शासकीय निमशासकीय आणि खाजगी क्षेत्रात नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील हिवरा बाजार येथे रेड स्वस्तिक सोसायटीच्या माध्यमातून नाशिकराव तिरपुडे भरतीपूर्व प्रशिक्षण शाळा स्थापन करण्यात आली आहे प्रशिक्षणार्थींना निवासी राहून प्रशिक्षण घेण्याच्या दृष्टीने 50 विद्यार्थी क्षमतेचे अद्यावत वस्तीगृह सूड केमी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्या सीएसआर फंडातून सूड केमी सदन -होस्टेल बिल्डिंग व बँक ऑफ इंडिया यांच्या सीएसआर फंडातून बँक आफ इंडिया सदनअद्यावत- वाचनाल बिल्डिंग बांधण्यात आलेली आहे.
पद्मश्री डॉक्टर विजय भाटकर. परम सुपर कंप्यूटर चे संशोधक यांचे शुभहस्ते व मिलिंद वाडकर ,प्रमुख सुदकेमी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई क्षेत्र, जय नारायण ,क्षेत्रीय प्रबंधक ,नागपूर झोन , चंद्रपाल चौकसे ,पर्यटक मित्र व संस्थापक रामधाम तीर्थ, सुरेश कोते व्यवस्थापकीय संचालक लिज्जत पापड, अध्यक्ष रेड स्वस्तिक सोसायटी, भगवान राऊत ,अध्यक्ष -मराठवाडा औद्योगिक असोसिएशन, कार्यकारी अध्यक्ष रेड स्वस्तिक सोसायटी, डॉ. टी. एस. भाल संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक एनटीपीएस ,अर्जुन घुगल ,केंद्र संचालक, एनटीपीएस, शांता कुमरे ,जिल्हा परिषद सदस्य ,प्रमोद चौगुले ,रेड स्वस्तिक सोसायटी ,अशोक शिंदे राजे वीरेंद्र भोसले,प्रामुख्याने उपस्थित होते .पद्मभूषण डॉक्टर विजय भाटकर यांनी युवकांना विविध रोजगारांच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने मोलाचे सहकार्य करण्याची घोषणा केली.
याप्रसंगी विविध मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले, या केंद्रातून आज पावितो 29 प्रशिक्षणार्थ्याची विविध क्षेत्रात निवड झालेली आहे .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर टी एस. भाल .यांनी केले, कार्यक्रमाचे संचालन कृष्णा भाल, आभार जगन्नाथ गराट यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता पंचमजी चौधरी, देवेंद्र अवथरे ,प्रकाश गराट ,वैष्णवी दीक्षित ,अमोल इनवाते ,अरविंद भटपई ,आकाश राजपांडे,वासुदेव निंघोट,परिष पल्लेवार यांनी सहकार्य केले.