Beed : मराठवाड्यात आंदोलन अधिकच तीव्र होत आहे. तर त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली असून बीड जिल्ह्यातील माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावरती दगडफेक करून बंगल्याला आग लावल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने मराठा समाजाचा उद्रेक आता बाहेर येत असल्याने आता मराठा नेत्यांना टार्गेट करणे सुरु केले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सहा दिवसांपासून सुरु आहे. त्यानंतरही मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात काहीच निर्णय झाला नाही. यामुळे राज्यात काही ठिकाणी जरांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी गावोगावी आंदोलने सुरु आहेत.
माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावरती दगडफेक करून बंगल्याला आग लावल्याची घटना नुकतीच घडली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कार्यकर्ते आक्रमक आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावरती दगडफेक केली. या घटनेत आमदार प्रक्षा सोळंके यांच्या बंगल्याचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावरती दगडफेक करत घोषणाबाजी आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराच्या काचा फोडल्या आंदोलन गेट तोडून घरामध्ये देखील घुसले..