Train Accident : आंध्र प्रदेशातील विजयनगरम येथे झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 14 वर पोहोचली आहे. वॉलटेअर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी सांगितले की, विशाखापट्टणम-रायगड ट्रेनच्या लोको पायलटने चुकून रेड सिग्नल ओलांडला होता, त्यामुळे ही ट्रेन विशाखापट्टणम-पलासा ट्रेनला धडकली. विशाखापट्टणम-पलासा ही विशाखापट्टणम रायगड ट्रेन सुद्धा त्याच ट्रॅकवर होती. सौरभ प्रसाद म्हणाले की, दोन्ही गाड्यांमध्ये कवच यंत्रणा नव्हती.
ईस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ बिस्वजित साहू यांनी सांगितले की, मदत आणि बचाव कार्य पूर्ण झाले आहे. आता ट्रॅकवर रेल्वेचे कामकाज पुन्हा सुरू करण्यावर भर आहे. अपघातामुळे अडकलेल्या प्रवाशांसाठी बस आणि ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. अपघातामुळे आतापर्यंत एकूण 18 गाड्या रद्द करण्यात आल्या असून 22 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. दुपारी ४ वाजेपर्यंत बाधित मार्गावरील गाड्या पुन्हा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
अपघाताचा तपास करण्यात येत आहे
वॉलटेअर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी सांगितले की, अवजड यंत्रे आणि क्रेन मागवण्यात आल्या आहेत. राज्य सरकार आणि अग्निशमन विभाग यांच्या समन्वयाने हे काम सुरू आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2.5 लाख रुपये आणि मध्यम जखमींना 50 हजार रुपयांची मदत रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केली आहे.
रेल्वेमंत्र्यांनी वॉर रूममधून अपघाताचा आढावा घेतला
विजयनगरमचे एसपी म्हणाले की, रेल्वे अपघातात ठार झालेल्यांपैकी सात जणांची ओळख पटली असून इतर मृतदेहांचीही ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीतील रेल्वे भवनच्या वॉर रूममधून परिस्थितीचा आढावा घेतला आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. रेल्वेमंत्र्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याशीही फोनवर चर्चा केली.
#WATCH | Andhra Pradesh train accident: Union Railways Minister Ashwini Vaishnaw monitored the situation from war room in Delhi, last night.
— ANI (@ANI) October 30, 2023
(Source: Rail Bhawan) pic.twitter.com/pJkvjXmuZs