Saturday, November 23, 2024
Homeराज्यपातूर | मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याचे तहसीलदाराचे आवाहन...

पातूर | मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याचे तहसीलदाराचे आवाहन…

पातूर – निशांत गवई

दिनांक ०१.०१.२०२४ या अहर्ता दिनांकवर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्‍त पुररिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक २७.आक्‍टोंबर २०२३ रोजी पातूर तालुक्‍यातील १२९ मतदार केंद्रावर मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (BLO) यांचे मार्फत प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यात आलेली आहे.

या अगोदर पातूर तालुक्‍यात एकुण १२७ मतदान केंद्र होते परंतु मा. भारत निवडणुक आयोगाच्‍या निर्देशानुसार मतदान सुसुत्रिकरणामध्‍ये पातूर तालुक्‍यातील वसाली व वनदेव येथे नविन मतदान केंद्र प्रस्‍तावित करण्‍यात आले होते व त्‍या केंद्राना आयोगाकडुन मान्‍यता सुध्‍दा मिळाली त्‍यामुळे आज रोजी पातूर तालुक्‍यात एकुण १२९ मतदान केंद्र आहेत.

१२९ मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (BLO) यांची नियुक्‍ती सुध्‍दा करण्‍यात आलेली आहे. तसेच पातूर तालुक्‍यातील BLO यांचे वरील नियंत्रण अधिकारी म्‍हणुन मा. आयोगाचे निर्देशानुसार एकुण १३ पर्यवेक्षक यांची सुध्‍दा नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे.

मा. आयोगाने मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (BLO) यांचे करिता बिएलओ अॅप (BLO APP) दिलेले असुन मा. आयोगाचे कार्यक्रमानुसार व प्राप्‍त सुचने नुसार BLO मतदारांचे नावाची नोंदणी, मतदान यादीमधील तपशीलातील दुरुस्‍ती व मतदार यादीतील नावाची वगळणी हे काम बिएलओ अॅप मध्‍ये ऑनलाईन करतात मतदार यादीतील सर्व नावांची पडताळणी ८० वर्ष किंवा तयावर वय असलेल्‍या मतदारांची पडताळणी, दुबार मतदारांची पडताळणी PSE फोटो सेमीलर ऐन्‍ट्री ची पडताळणी DSE डुपलीकेड सेमीलर ऐन्‍ट्रीची पडताळणी तसेच मतदारांचे नोंदणी कॅम्‍प घेऊन मतदार नोंदणी करतात.

पातूर तालुक्‍यातील सर्व मतदान केंद्रावर दिनांक ०४ नोव्‍हेंबर २०२३ शनिवार व ०५ नोव्‍हेंबर २०२३ रविवारला मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी स्‍पेशल कॅम्‍प घेणार असुन ज्‍या मतदारांना नोंदणी करावयाची आहे त्‍यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपल्‍या नावाची नोंदणी करुन घ्‍यावी.

तसेच आपण स्‍वत: VOTER HELPLINE APP व्‍दारे करावी. असे आव्‍हान श्री रवि काळे, तहसीलदार तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी वि.स.म.सघ बाळापुर यांनी केले आहे. अशी माहिती आज रोजी तहसीलदार रवी काळे तथा अजय तेलगोटे यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: